नगर : वरवंडी शिवारात आढळला नऊ फूट लांब सात किलो वजनाचा अजगर | पुढारी

नगर : वरवंडी शिवारात आढळला नऊ फूट लांब सात किलो वजनाचा अजगर

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील वरवंडी शिवारातील थापलिंग घाटालगत सोमवारी रात्री अजगर आढळून आला. सुमारे नऊ फूट लांब व सात किलो वजन असलेल्या या महाकाय अजगराला सर्पमित्राने वनविभागाच्या मदतीने निसर्गात मुक्त केले.

एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा! शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

याबाबतची माहिती अशी की सोमवार (दि.27) जूनच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास विशाल नामदेव शिंदे हे वरवंडी शिवारातील थापलिंग घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल नवरत्न येथून जात असताना त्यांना भला मोठा साप रस्ता ओलांडताना दिसला. त्यामुळे त्यांनी स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती देऊन सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांना लागलीच संपर्क केला.

नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं

रात्र असतानाही घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र शिवप्रसाद पवार हे थापलिंग घाटाच्या पायथ्याशी हजर झाले आणि त्यांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी हा साप नसून मोठा अजगर असल्याचे लक्षात आले.

 मी पळपुटा नाही म्हणत संजय राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर 

तब्बल नऊ फूट लांबीचा व सात किलो वजन असलेल्या या अजगराला मंगळवारी सकाळी वनक्षेत्र अधिकारी एस. एस. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बबन मंचरे, वनरक्षक रामकृष्ण सांगळे यांनी महाकाय अजगराला ताब्यात घेऊन सर्पमित्र शिवप्रसाद पवार व डॉ. अनिल क्षीरसागर यांच्या मदतीने त्याला निसर्गात मुक्त केले. हा महाकाय अजगर तीन वर्षे वयाचा व मादी जातीचा असल्याची माहिती मिळाली आहे.

Back to top button