नगर : रोहयोच्या पैशांपासून हजारो लाथार्थी वंचित | पुढारी

नगर : रोहयोच्या पैशांपासून हजारो लाथार्थी वंचित

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत विविध योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे मिळण्यासाठी तालुक्यातील लाभार्थ्यांसह सर्वपक्षीय मोर्चा पाथर्डी पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधात 4 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात आले आहे. वंचित लाभार्थी व कार्यकर्ते यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केले आहे.

Breaking News : अखेर ठरलं! फडणवीस-शिंदे यांचा आज ७ वाजता शपथविधी

पाथर्डी तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रोजगार हमी योजनेमधील गायगोठा व फळबाग योजनेतील लाभार्थ्यांना कुशल-अकुशलचे अनुदान गेल्या 6 महिन्यांपासून मिळालेले नाही. प्रशासनाने लाभार्थी शेतकर्‍यांना वेठीस धरले आहे.

कोरोना घालतोय घिरट्या; खेळाडू झोडताहेत पार्ट्या

प्रशासक असल्याने मनामानी कारभार : आरोप

सद्यस्थितीत प्रशासक असल्याने पंचायत समितीत मनमानी कारभार चालू आहे. शेतकरी लाभार्थी यांनी गायगोठे, विहिरी, फळबाग इत्यादी योजनेतील कामे व्याजाने पैसे काढून केली आहेत. प्रशासन शेतकर्‍यांची पिळवणूक करून हेळसांड करीत आहे. 31 मार्च पूर्वी रोजगार हमी योजनेतील पैसे जिल्हा परिषदेला जमा असताना पाथर्डी पंचायत समितीने या पैशाचे वितरण केले नाही. रोजगार हमी योजनेतील शासकीय यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे लाभार्थी या योजनेच्या पैशापासून वंचित राहिले आहेत, असे दौंड यांनी सांगितले.

Bachchu Kadu : इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडूंना क्लीन चिट, काय आहे नेमकं प्रकरण?

शेतकर्‍यांच्या गायी गोठ्याच्या बांधणीसाठी शासन 77 हजार रुपये देते. या योजनेतील गरीब लोकांनी गाय गोठा बांधण्यासाठी पैशाची उसनवारी करून, तर काहींनी व्याजाने पैसे काढून ही योजना पूर्ण केली. मात्र, पाच ते सहा महिने झाले या योजनेतील शेकडो लोकांना अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाहीत. पाथर्डी पंचायत स्तरावरती प्रशासनाने मार्च अखेरीपर्यंत लाभधारक शेतकर्‍यांना योजनेतील पैसे मिळण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याने लोकांना या योजनेच्या पैशांपासून वंचित राहावे लागत आहे.

राष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज वैध

प्रशासक आल्यापासून पंचायत समितीच्या सर्व विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी जाणूनबुजून वेळेवर काम करत नसल्याने लोकांना योजनेचा लाभ मिळत नाही. रोजगार हमी योजनेतून शेतकर्‍यांसाठी फळ लागवड योजनेसाठी लाभ मिळण्यासाठी पंचायत समिती मधील कृषी विभागाने काम केले नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करावी.

चार जुलै रोजी सर्वपक्षीय मोर्चा

लाभार्थ्यांना गायगोठा, अनुदान विहीर, फळबाग लागवड तसेच 25-15 या कामांचे पैसे न दिल्यास दि.4 जुलै रोजी सर्व पक्षीय मोर्चा आयोजीत करण्यात येणार आहे. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. संतोष कुसळकर, पप्पू शेख,कृष्णा फुंदे, अनिल दहिफळे, नितिन मासाळ,विकास गोरे, अंबादास फुंदे, संजय आंधळे, गणेश म्हस्के, चैतन्य गोरे, कृष्णा गायकवाड, अनिल जाधव, राजेंद्र राठोड, किशोर देशमुख, बाळासाहेब काकडे आदींच्या स्वाक्षर्‍या निवेदनावर आहे.

Back to top button