नगर झेडपीत सात जणांवर शिस्तभंग; तिघांचे निलंबन | पुढारी

नगर झेडपीत सात जणांवर शिस्तभंग; तिघांचे निलंबन

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदे अंतर्गत सेवेत असलेल्या 10 ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कामकाजातील वेगवेगळ्या कारणांमुळे सीईओ आशिष येरेकर यांनी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या कारवाईने ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यापैकी तीन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे.

कोरोना घालतोय घिरट्या; खेळाडू झोडताहेत पार्ट्या

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल यांनी प्रशासनाला शिस्त लावली आहे. मात्र, यामध्येही काही कर्मचार्‍यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावर सीईओ येरेकर यांनी कारवाईचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आर. बी. काळे, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत गायकवाड जळगाव यांना गैरवर्तनाबाबत बडतर्फ करण्यात आले आहे. र. गु. शेलार, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत वडगाव तनपुरा, ता. कर्जत यांना गैरवर्तनाबाबत सक्तीने सेवानिवृत्त करण्याची शिक्षा दिली आहे.

Bachchu Kadu : इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडूंना क्लीन चिट, काय आहे नेमकं प्रकरण?

ज्ञा. गो. सोनवणे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत मिरी, ता.पाथर्डी यांच्यावर गैरवर्तनाबाबत चार वेतनवाढी कायमस्वरुपी बंद करण्याची कारवाई केली आहे. आ. दा. आखाडे, तत्कालीन ग्रामसेवक ग्रामपंचायत हळगाव, ता.जामखेड येथे कार्यरत असताना अनियमितता व गैरहजर प्रकरणी दोन वेतनवाढी कायमस्वरुपी बंद ही शिक्षा केलेली आहे. शि. बु. सुपे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत लोणी खु. ता.राहाता येथे गैरवर्तन प्रकरणी दोन वेतनवाढी कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे बहुमत चाचणी नाही, विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित

आर. व्ही. बोर्डे, तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत बोधेगाव, ता.राहुरी गैरवर्तनाबाबत प्रकरणी एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद केली आहे. ब. तु. शेटवाड, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत माळी चिंचोरा, ता. नेवासा यांच्यावर गैरवर्तनाबाबत एक वेतनवाढ तात्पुरती बंदचेही आदेश काढले आहेत.

Breaking News : अखेर ठरलं! फडणवीस-शिंदे यांचा आज ७ वाजता शपथविधी

याशिवाय इम्रान शेख, ग्रामसेवक, ग्रामपंचायत खुरदैठण, ता. जामखेड पाक्षिक, मासिक सभांना गैरहजर, विविध योजना राबविणेकामी दुर्लक्ष करणे, महादेव मल्हारी ढाकणे, तत्कालीन ग्रामसेवक, दिघी, ता. नेवासा- 14 वा वित्त आयोग आर्थिक अनियमितता निदर्शनास येणे, श. यु. पठाण, तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत काळेगाव, ता. शेवगाव गैरवर्तन याप्रकरणी सेवा निलंबित केल्याची कारवाई करण्यात आल्याचे सीईओंच्या आदेशात म्हटले आहे.

Back to top button