नगर : भरदिवसा घराचे कुलूप तोडून मंगळसूत्र लांबविले | पुढारी

नगर : भरदिवसा घराचे कुलूप तोडून मंगळसूत्र लांबविले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा:  राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे भर दिवसा अज्ञात भामट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून 20 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना दि. 20 जून रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तन्वी सचिन केदारी (वय 32, राहणार कारमेल रेसीडेन्सी, डि पॉल स्कूलजवळ, राहुरी फॅक्टरी) दि. 20 जून रोजी सकाळी पावणे नऊ वाजेदरम्यान राहत्या घराला कुलूप लावून मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या.

नाशिक महापालिका : प्रभाग रचनेसंदर्भात आणखी एक याचिका दाखल

सव्वा दहा वाजता त्या पुन्हा घरी आल्या. या दीड तासाच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली, तसेच कपाट खोलून उचकापाचक केली असता कपाटात ठेवलेले 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून घटनास्थळावरून धूम ठोकली. तन्वी सचिन केदारी यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button