नाशिक महापालिका : प्रभाग रचनेसंदर्भात आणखी एक याचिका दाखल | पुढारी

नाशिक महापालिका : प्रभाग रचनेसंदर्भात आणखी एक याचिका दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेविषयी मुंबई उच्च न्यायालयात आधीच याचिका दाखल असताना आता पाथर्डी शिवारातील प्रभाग रचनेबाबत आक्षेप घेणारी आणखी एक याचिका दाखल झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला पत्र पाठवून या संदर्भात विचारणा केली आहे. एकूणच प्रभाग रचनेविषयी दाखल याचिकांमुळे प्रभाग रचनेच्या आराखड्याविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नाशिक येथील कौस्तुभ परांजपे यांनी याचिका दाखल करत रचनेवर आक्षेप घेत प्रभाग रचना तयार करताना नाशिक मनपाने राज्य निवडणूक आयोगाचे नियम पाळले नसल्याची तक्रार केली आहे. परांजपे यांच्या तक्रारीवर राज्य निवडणूक आयोगाने सुनावणी घेत दखल घेतली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, घेतलेल्या आक्षेपांची निवडणूक आयोगानेही दखल घेतली नसल्याचे परांजपे यांचे म्हणणे असून, याबाबतच त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आणखी एक याचिका दाखल झाली असून, पाथर्डी शिवारातील प्रभाग रचनेबाबत ही याचिका आहे.

हेही वाचा :

Back to top button