Belgaum : कारवारमधील कोकणी फलकांना काळे फासणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

Belgaum : कारवारमधील कोकणी फलकांना काळे फासणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खानापूर, पुढारी वृत्तसेवा : कारवार शहरातील रस्त्याची माहिती दर्शविणाऱ्या कोकणी फलकांवर काळे फासणाऱ्या कन्नड रक्षण वेदिका या संघटनेच्या पाच जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकणी भाषेतील नामफलक मराठीत असल्याचे समजून करवेच्या कार्यकत्यांनी डॉ. कमलाकर रस्ता या फलकाला काळे फासले होते. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कोकणी भाषा प्रेमींनी काळे फासणाऱ्याऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याचे निवेदन पोलीस व तहसिलदारांना दिले होते. (Belgaum)

पोलीसांनी या प्रकरणाची  गांभीर्याने दखल घेऊन काळे फासणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण कोठारी (रा. दांडेली), मंजू पंतोजी (रा. दांडेली), नागराज शेट्टी (रा. कुमठा), उदय नाईक (रा. अंकोला), हनिफ इस्माईलसाब (रा. गोकर्ण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  कायदा हातात घेऊन शहराची शांतता भंग करणाऱ्या या पाच जणांवर आता कोणती कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (Belgaum)

हेही वाचलतं का?

Back to top button