कोपरगाव : चांदेकसारेतील रोडरोलर चोरणारा गजाआड | पुढारी

कोपरगाव : चांदेकसारेतील रोडरोलर चोरणारा गजाआड

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा गायत्री कॅम्पस (चांदेकसारे ता. कोपरगाव) येथून चोरी केलेला रोडरोलर व आरोपीला चिकलठाणा जिल्हा औरंगाबादेतून अटक करण्यात कोपरगाव तालुका पोलिसांना यश आले आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दिनांक 29 जुन रोजी सकाळी 8 ते 10:30 वा. दरम्यान गायत्री कंन्ट्रक्शन कॅम्पस चांदेकसारे येथून रोडरोलर (नंबर एपी 03 टी 3902) हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला असल्याबाबत बापू जलापती रेडडी (वय 42, रा. आयतापल्ली ता. पेगडापेल्ली जि. करीमनगर, तेलंगना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला होता.

ओतूरच्या ५२ गल्लीत बिबट्याचा फेरफटका; सायंकाळी ६ नंतर व पहाटे दक्षता घेण्याचे आवाहन

तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी गुन्हयाचे तपासाचे चक्रे फिरविले. आरोपीचा गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेवून तपास केला. सदरचा रोडरोलर चोरुन नेणारा आरोपी शिवानंद धर्माआण्णा नाईक (वय 42, हल्ली रा. साईसिटी, ता. कोपरगाव. मुळ रा. मोरब ता. रायबाग जि. बेलगाव, कर्नाटक) यास पोलिसांनी अवघ्या 24 तासाचे आत सापळा रचून जेरबंद केले.

Back to top button