संगमनेरात हनीट्रॅपमधून 40 लाखांचा गंडा शिर्डी पोलिसांच्या सतर्कतेने ‘हनी’ ला गजाआड | पुढारी

संगमनेरात हनीट्रॅपमधून 40 लाखांचा गंडा शिर्डी पोलिसांच्या सतर्कतेने ‘हनी’ ला गजाआड

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा: संगमनेर तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या ओळखीमधून काँग्रेसच्या एका पंचायत समिती सदस्याकडून तब्बल 40 लाख रुपये उकळणार्‍या महिलेच्या शिर्डी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत, मात्र तिचा साथीदार फरार झाला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, काँग्रेसचे पंचायत समितीच्या एका सदस्याची तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणार्‍या महिलेशी ओळख झाली.

तिने तिची आर्थिक अडचण सांगून त्या सदस्यांकडून 2 लाख रुपये हात उसने घेतले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी तिने 15 दिवसांत 2 लाख परत देखील केले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. काही दिवस जात नाही तोच तिने पुन्हा त्या सदस्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा सदस्याने घुलेवाडी येथील एका बँकेतून तिला 5 लाख आरटीजीएस केले. हा प्रकार येथेच थांबला नाही, तर तिने माझी नेवासा येथे जमीन आहे.

वासरावर बिबट्याचा हल्ला, मांढर खोर्‍यात बिबट्याची दहशत; परिसरात भीतीचे वातावरण

तिचे रेकॉर्ड बनविण्यासाठी मला 15 लाख रुपयांची गरज आहे. माझा व्यवहार झाला की, तुमचे सर्व पैसे परत करते. तेव्हा एक हमी म्हणून तिने सह्या केलेले दोन चेक सदस्याच्या ताब्यात दिले. असे आजवर तिने 20 लाख रुपये उकळले होते. दरम्यान, 7 मार्च 2022 रोजी दुपारी त्या सदस्याला अनिता गोसावी हिचा फोन आला. उद्या तुम्हाला तुमचे सर्व पैसे द्यायचे आहेत, बाभळेश्वरला या, असे सांगितले. दि. 8 मार्चला ते सदस्य बाभळेश्वर येथे गेले असता त्या महिलेने तिच्या हातातील पैशाची बॅग त्यांना दाखविली, त्यात पैशांचे बंडल होते. ती म्हणाली की, पैसा असा रस्त्यावर मोजता येणार नाही. मी हॉटेलमध्ये रूम घेतली आहे. तुम्ही तिकडे या, असे त्या सदस्यास तिने सांगितले.

सदस्य थेट रुमवर गेले. तिने खोलीची कडी लावून. तिने एका व्यक्तीला बोलविले. ती त्या सदस्याशी आगळे- वेगळे चाळे करू लागताच त्या व्यक्तीने मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण केले. त्यावेळी हे काय चालले, असे सदस्य म्हणताच तिने व व्यक्तीने, घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत या महिलेले पुन्हा 5 लाखाची मागणी केली. दरम्यान, आता एवढे पैसे नाहीत, संगमनेरला गेल्यानंतर रुपये देतो.

चोरीच्या ४५ मोटारसायकल जप्त; आळेफाटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

हा सर्व प्रकार येथेच बंद करा, अशी विनंती सदस्याने केली. त्याच दिवशी सायंकाळी राजेंद्र गिरी हा समनापुरला आला. त्या सदस्याने काही पैसे दिले असता, मला उद्या 4 लाख 50 हजार रुपये हवे आहेत. नाहीतर तुझी अश्लिल क्लिप मी व्हायरल करेल, असे धमकावले. यानंतर ठरल्याप्रमाणे या सदस्याने 4 लाख 50 हजार गिरी यास दिले.

दरम्यान, अखेर वैतागलेल्या सदस्याने शिर्डी पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांची भेट घेतली. त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यांनीही ‘त्या’ सदस्यास धीर देत कारवाईचे आश्वासन दिले. इतके पैसे दिल्यानंतरही त्या हनीने पुन्हा त्यांच्याकडून 4 लाखांची मागणी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई सुरु झाली. दोन ते तीन दिवसांपूर्वी शिर्डीत 4 लाखांची रक्कम देण्याचे ठरले. पोलिसांनी खुणा केलेल्या नोटांचे बंडल तयार करुन ते पीडित सदस्यांकडे दिले. आसपास पोलिसांनी सापळा लावला.ठरल्याप्रमाणे सदरची हनी शिर्डी बस स्थानकासमोरील गल्लीत रक्कम घेण्यास आली.

यावेळी त्या सदस्याने 4 लाखांची रक्कम तिच्याकडे सुपूर्द केली. त्याच दरम्यान दबा धरुन बसलेल्या महिला पोलिसांनी तिच्यावर झडप घालून तिला ताब्यात घेतले. तिच्या पिशवीची झडती घेतली असता पोलिसांनी विशिष्ट खुणा करुन दिलेले नोटांचे बंडल त्यात आढळून आले.

Rishabh Pant : कर्णधार म्हणून ऋषभ पंतच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

याप्रकरणी शिवाजी रहाटे यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अनिता गोसावी व राजेंद्र गिरी या दोघांविरोधात हनिट्रॅप कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. अनिता गोसावी हिला गजाआड केले तर राजेंद्र गिरी पसार झाला आहे.

अनिता गिरी या महिलेने त्या सदस्या कडून 17 मार्च, 2022 रोजी अकोले नाका येथे त्यांच्याकडून 7 लाख 50 हजार रक्कम उकळली. त्यानंतर चारच दिवसांत 21 मार्च रोजी त्याच ठिकाणी पुन्हा 7 लाख 50 हजार रुपये तर 28 मार्च रोजी परिवार शॉपीजवळ 5लाखांची रक्कम उकळली. 1 एप्रिल रोजी राजेंद्र गिरी याने त्यांना शासकीय विश्रामगृृहात बोलावून 4 लाख रुपये घेतले तर तिने 19 एप्रिल 2022 रोजी अकोले नाक्यावर 7 लाख 50 हजारांची रक्कम उकळली. एकंदरीत जानेवारी 2022 पासून एप्रिल पर्यंत या दोघाही ठकांनी त्या नेत्याच्या प्रतिष्ठेचा गैरफायदा घेत त्यांना वेळोवेळी धमकावित त्यांच्याकडून 40 लाख 50 हजार रुपये उकळले.

Back to top button