अवैध धंद्यांविरोधात पोलिस ठाण्यात उपोषण | पुढारी

अवैध धंद्यांविरोधात पोलिस ठाण्यात उपोषण

 

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा : अवैध धंदे त्वरित बंद करा या प्रमुख मागणीसाठी गुरुवार रोजी अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे कार्यकर्ते शन्नो पठाण यांनी पाथर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात उपोषण केले. तालुक्यात चालू असलेले अवैध धंदे बंद करू असे तोंडी आश्वासन पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बाबर आझम याने टाकले विराटला मागे

या आंदोलनाला मोसीन पठाण, अमीर रफिक शेख,सलमान पठाण, शौकत शेख, आरमान शेख, दिलावर पठाण,अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, नासिर शेख, अरविंद सोनटक्के, अण्णा हरेर, तानाजी शेख, फिरोज पठाण, हुमायून आतार, विष्णुपंत पवार, मुन्ना खलिफा आदींनी पाठिंबा दिला. तालुक्यात जुगार, मटका, ऑनलाईन जुगार, अवैधरित्या दारू विक्री, बिंगो नावाचा जुगार मोठ्या प्रमाणात चालू असून या विरोधात आवाज उठवला, तर जीवे मारण्याची धमकी दिली जाते. दरम्यान, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

 

Back to top button