चार पालिकांची अंतिम प्रभागरचना प्रसिध्द | पुढारी

चार पालिकांची अंतिम प्रभागरचना प्रसिध्द

नगर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व राहाता या चार नगरपालिकांची अंतिम प्रभागरचना गुरुवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी व जामखेड या नगरपालिकांच्या प्रभाग नकाशांना राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या चार नगरपालिकांची प्रभागरचना शुक्रवारी प्रसिध्द होणार आहे.

‘तो’ घालतो 5 किलो सोन्याचे दागिने

श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, देवळाली प्रवरा, राहाता, पाथर्डी, शेवगाव, जामखेड या नऊ नगरपालिकांच्या पदाधिकार्‍यांचा कालावधी डिसेंबर 2021 मध्ये संपला आहे. नेवासा नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांचा कालावधी जुलै महिन्यात संपणार आहे.
त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने या नगरपालिकांच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे.

मांजर झाली ‘पदवीधर’!

त्यानुसार प्रभागरचनेचा कार्यक्रम हाती घेऊन अंतिम प्रभागरचना तयार झाली असून, राहुरी व नेवासा नगरपंचायतीची अंतिम प्रभागरचना मंगळवारीच जाहीर झाली आहे. 7 जून रोजीच अंतिम प्रभागरचना जाहीर होणे आवश्यक होते. परंतु आयोगाने दोन दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर व राहाता नगरपालिकांची अंतिम प्रभागरचना गुरुवारी जाहीर केली आहे. शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी व जामखेड या नगरपालिकांच्या प्रभाग नकाशांना गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. भोसले या चार नगरपालिकांची अंतिम प्रभागरचना शुक्र्रवारी प्रसिध्द करणार आहेत.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
नगरपालिकांची अंतिम प्रभागरचना जाहीर होत नाही तोच, राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 13 जून रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या सोडतीवर दि. 15 ते 21 जून या कालावधीत हरकती व सूचना मागविल्या आहेत. यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढली जाणार नाही.

श्रीरामपूर पालिकेत सर्वाधिक संख्या
शासनाने पालिकांच्या नगरसेवकपदांच्या संख्येत वाढ केली. त्यामुळे श्रीरामपूरमध्ये 17 प्रभाग असून, यामधून 34 नगरसेवक निवडून येणार आहेत. संगमनेरमध्ये 15 प्रभाग असून नगरसेवकपदांची संख्या 30 आहे. कोपरगावमध्ये 15 प्रभाग असून, यामध्ये देखील 30 नगरसेवक निवडले जाणार आहेत. राहाता नगरपालिकेत 10 प्रभाग तयार करण्यात आले असून, त्या ठिकाणी 20 नगरसेवक निवडले जाणार आहेत.

Back to top button