‘तो’ घालतो 5 किलो सोन्याचे दागिने | पुढारी

‘तो’ घालतो 5 किलो सोन्याचे दागिने

हनोई : सोन्याच्या दागिन्यांची हौस असणारे अनेक लोक जगभरात पाहायला मिळतात. आपल्याकडेही असे अनेक लोक आहेत. आता व्हिएतनाममधील एक माणूस याबाबत प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. हा माणूस रोज पाच किलो सोन्याचे दागिने परिधान करून वावरतो.

हा माणूस एक फूड कॉर्नर चालवतो. दागदागिन्यांनी नखशिखान्त मढूनच तो आपले हे काम करतो. हो ची मिन्ह नावाच्या शहरात राहणार्‍या या माणसाचे नाव आहे दो नगॉक थुआन. 34 वर्षांचा हा माणूस त्याच्या या दागिन्यांमुळेच प्रसिद्ध आहे. त्याच्या या प्रसिद्धीचा लाभ त्याच्या फूड कॉर्नरलाही होत असतो. त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्याकडील खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी अनेक लोक येतात. अनेक लोक त्याच्यासमवेत सेल्फी टिपतात.

त्यालाही आपल्या दागिन्यांचे प्रदर्शन करण्याची चांगलीच हौस आहे. अर्थात त्याच्या व्यवसायातही त्याला याचा फायदा होत आहे. त्याच्या देहावर एकूण दहा सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे 30 ब—ेसलेट तसेच बारापेक्षा अधिक जाडजूड नेकलेस आहेत. त्याने डिझायनर इअररिंग्ज, तोडे परिधान केले असून त्याच्या पायाच्या बोटांमध्येही अंगठ्या आहेत!

Back to top button