श्रीगोंद्यात पावसाची तडाखेबंद बॅटिंग, घर आणि शेतमालाचं मोठ्याप्रमाणात नुकसान | पुढारी

श्रीगोंद्यात पावसाची तडाखेबंद बॅटिंग, घर आणि शेतमालाचं मोठ्याप्रमाणात नुकसान

श्रीगोंदा -पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव, हिरडगाव, पारगाव, घोटवी, सुरोडी आदी गावांना वादळी पावसाच जोरदार तडाखा बसला आहे. डाळिंब, लिंबोणींची झाडे कोलमडली असून कांद्याचे पिक भुईसपाट झाले आहे. घराचे छत उडाले असून विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी विज पुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

कोकणगावचा शेंडगे वाडी वादळी वाऱ्याचा केंद्रबिंदू होता. सुरेश शेंडगे, तुकाराम शेंडगे, संजय शेंडगे ,गोरख शेंडगे, शरद शेंडगे, विठ्ठल शेंडगे गणेश भालेकर राजेंद्र जामदार संदीप जामदार यांच्या डाळिंब, लिंबोणीच्या फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. हिरडगावचे उपसरपंच योगेश दरेकर यांच्या शेत तळ्याचा कागद उडून गेला आहे.

सिंधुदुर्ग : मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्‍तीवर प्राणघातक हल्ला

पारगाव सुद्रिक येथील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेले आहेत. घोटवी,सुरोडी, बेलवंडी, कोठार, देऊळगाव, भावडी घूगल, वडगाव,चांडगाव, शेडगाव, घोडेगाव परिसरात नुकसान झाले आहे. पारगाव सुद्रिक शिवारात कापरेवस्ती जवळ श्रीगोंदा रोडवर झाड पडल्याने वाहतुक श्रीगोंद्याकडे येणारी व नगरकडे जाणारी वाहतुक गुरुवारी संध्याकाळी तीन तास बंद पडली होती. जेसीबी च्या सहायाने हे झाड हटविण्यात आले.

तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी कृषी खात्याला वादळामुळे ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई साठी शासनाला अहवाल पाठवावा अशी मागणी कोळगाव चे सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडगे यांनी केली आहे.

सांगलीत दाम्पत्यास मारहाण ; पूर्ववैमनस्यातून घटना

तहसीलदार मिलिंद कुलथे म्हणाले की कामगार तलाठी कृषी सहाय्यकांना यांच्याकडून पिक नुकसानीचा अहवाल मागितला आहे.त्यानंतर पुढील निर्णय होईल.

काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने श्रीगोंदा, होलेवाडी, लिंपणगाव परिसराला प्रचंड तडाखा बसला आहे.
एस के एंटरप्रायजेस सिमेंट पाईप कंपनी याठिकाणी झाड कोसळून ऑफिस बिल्डिंग खिडक्या फुटल्या, मोल्ड मशिनरी, सिमेंट गोण्या, काही माल भिजून खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Back to top button