सांगलीत दाम्पत्यास मारहाण ; पूर्ववैमनस्यातून घटना | पुढारी

सांगलीत दाम्पत्यास मारहाण ; पूर्ववैमनस्यातून घटना

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून संजय बाबू बुटिया (वय 35) व त्यांच्या पत्नीस बेदम मारहाण करण्यात आली. गणेशनगरमधील काळे प्लॉटमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण लालजी बुटिया, राज लालजी बुटिया, राजेश लालजी बुटिया व सचिन लालजी बुटिया (सर्व रा. रॉकेल गल्ली, गणेशनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नाव आहेत. फिर्यादी संजय बुटिया मूळचे गुजरातमधील आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते सांगलीत गणेशनगरमध्ये राहतात. त्यांचा संशयितांशी किरकोळ कारणावरुन गेल्या आठवड्यात वाद झाला होता. यातून त्यांनी बुटिया यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पत्नीस ओठावर ठोसा मारून जखमी केले होते.

बुटिया यांच्या शेजारील रहिवाशांनी गर्दी केल्यानंतर संशयित पळून गेले. त्यानंतर बुटिया यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

Back to top button