नरसाळीत झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत | पुढारी

नरसाळीत झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा

रविवारी सायंकाळी अचानक सुरु झालेल्या वीज पावसासह वादळ-वार्‍याने राहुरी तालुक्यातील देवळाली रस्त्यावर नरसाळी येथे बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने तब्बल अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, या ट्रॅफिक जॅममध्ये ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचेही वाहन अडकले.

राष्ट्रपती निवडणुकीचे पडघम

या वाहनात स्वतः मंत्री तनपुरे होते का, हे मात्र समजू शकले नाही. झाड पडण्यापूर्वी येथे दुचाकीचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
रस्त्यावरील झाड दूर करण्यासाठी नगराध्यक्ष सत्यजित कदम व सहकार्‍यांनी मदतकार्य केले. दरम्यान, श्रीरामपूर शहरासह परिसरात सायंकाळी 5 वाजेनंतर अचानक वादळ-वारे सुरु झाले. दुपारनंतर उन्हाची तीव्रता कमी झाली. सायंकाळनंतर हवेमुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता .

Back to top button