पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असल्यास राऊतांनी धूणीभांडी करायची का? : गजानन काळे | पुढारी

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असल्यास राऊतांनी धूणीभांडी करायची का? : गजानन काळे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदावरून मोठे भाकीत केले आहे. येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल असे त्यांनी म्हटले आहे. साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेही यात मागे नाही. त्यांचे नेते गजानन काळे यांनी मुंडे यांच्या विधानावरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेनेला टोले लागवले आहेत.

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी ट्विटच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा आधार घेत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असं धनंजय मुंडे म्हणतायत, तर मग संजय राऊत व त्यांच्या सेनेने काय धूनी भांडी करायची का मग तुमची? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सेनेवर निशाणा साधला आहे. तसेच हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि तो सहन केला जाणार नाही. खंजीर, कोथळा, वाघनखे, मर्द, मावळा सह उद्याचा टोमणे अग्रलेख वाचा. अर्थात दै. सामना नव्हे टोमणा. अशा शब्दात गजाजन काळे यांनी संजय राऊतांना टोले लगावले आहेत.

Back to top button