पेन्शनर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी बैठक घेऊ : आमदार नीलेश लंके | पुढारी

पेन्शनर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी बैठक घेऊ : आमदार नीलेश लंके

कान्हूरपठार : पुढारी वृत्तसेवा

पारनेर-नगर मतदार संघाचा आमदार हा सामान्य शिक्षकाचा मुलगा असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. पेन्शनर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. बाभूळवाडे (ता.पारनेर) येथे रंगनाथ बागल यांच्या अध्यक्षतेखाली पारनेर तालुका पेंन्शनर असोसिएशचा वार्षिक स्नेह मेळावा झाला या प्रसंगी आमदार लंके बोलत होते.

आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात

या प्रसंगी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष द. मा. ठुबे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब डेरे, बन्सी उबाळे, ज्ञानदेव लंके, ना.रा.ठुबे, सि.बा. ठुबे, मुळे, भाऊसाहेब ताठे, ग.म. मेहर, चं.ब काळे, पोपट इथापे, राजाराम ठुबे, परसराम सोंडकर, नारायण लोंढे, तुकाराम लोंढे, भिकाजी रेपाळे, भाऊसाहेब नाबगे, शिवाजी ठाणगे, नानाभाऊ खामकर, विश्वनाथ कवडे, सहादु थोपटे, दत्तात्रय भोसले, कलावती आढाव, आनंद पवार, उपस्थित होते.

कोळगाव शिवारात भीषण अपघात: एक ठार; पाच जखमी

या वेळी आमदार लंके म्हणाले की, अप्रशिक्षित पेन्शनर शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. प्रामुख्याने शिक्षकांचे प्रलंबित देणे 100 कोटी रुपये आहे. तसेच पगार अकाऊंट जनरल मुंबई यांच्यामार्फत झाले, तर पगार महिन्याच्या एक तारखेला होणार आहे. जवळपास 325 अप्रशिक्षित शिक्षक हे हक्काच्या पेंन्शन पासून वंचित आहेत.

नगर : वृध्द दाम्पत्याच्या निघृण खून प्रकरणी तीन गुन्हेगारांना अटक

हे सर्वच प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच अर्थसचिवांची बैठक लावून यात काही मार्ग निघत असेल, तर निश्चित काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली.मेळाव्यास पारनेर तालुक्यातील पेन्शनर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार लंके याच्यासमोर त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. आमदार लंके यांनी राज्य सरकारकडे व्यथा मांडण्याचे आश्वासन दिल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला.

 

Back to top button