पाल्यांची 17 जुलैलाच नीट परीक्षा, शिक्षक बँक मतदान तारीख बदलण्याची होते आहे मागणी | पुढारी

पाल्यांची 17 जुलैलाच नीट परीक्षा, शिक्षक बँक मतदान तारीख बदलण्याची होते आहे मागणी

नगर : पुढारी वृत्तसेवा

सहकार विभागाने शिक्षक बँकेची निवडणूक जाहीर केली आहे. 17 जुलै रोजी मतदान घेतले जाणार आहे. मात्र, याच दिवशी नीटची परीक्षा असल्याने सुमारे दोन हजार शिक्षक सभासदांना आपल्या मुलांना घेवून परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे.

त्यामुळे अनेक शिक्षक मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने सहकार विभागाने मतदानाच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी आमदार कपिल पाटील शिक्षक मित्र मंडळाचे प्रमुख दिनेश खोसे यांसह पदाधिकार्‍यांनी केली आहे.
‘शिक्षक भारती’ ही संघटना आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.

अंजनेरी हेही हनुमानाचे जन्मस्थळ, हे सर्वांनी मान्य करावे- आचार्य गंगाधरशास्त्री पाठक

शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या दिवशीच 17 जुलैला ‘नीट’ परीक्षा आहे. या परीक्षेसाठी दोन हजारांपेक्षा अधिक शिक्षकांची मुले बसलेली आहेत. त्यामुळे अनेक शिक्षक सभासदांची पाल्यांना सोडविण्यासाठी धावपळ होणार आहे, काही शिक्षक मतदानापासूनही वंचित राहू शकतात.

अपस्माराचा मुकाबला

त्यामुळे सहकार विभागाने ही अडचण लक्षात घेवून मतदानाच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे दिनेश खोसे, जिल्हा संपर्क प्रमुख दिनकर जेवे, तात्यासाहेब जगताप, अप्पासाहेब निंबोरे, गोपीनाथ महारनवर आदींनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे केली.

कोल्हापूर महापालिका निवडणूक : ओपन प्रभागांतील लढती होणार हाय व्होल्टेज!

Back to top button