राज्यात तीन पक्षांचे सरकार भांड्याला भांडे लागणारच; पालकमंत्री मुश्रीफ यांचा निर्वाळा | पुढारी

राज्यात तीन पक्षांचे सरकार भांड्याला भांडे लागणारच; पालकमंत्री मुश्रीफ यांचा निर्वाळा

नगर : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार तयार झाले आहे. त्यामुळे निधी वाटप व इतर काही कारणांमुळे भांड्याला भांडे लागणारच, असा निर्वाळा राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना सर्व अधिकार आहेत. कोणा एका पक्षावर अन्याय होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना सांगावे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन समिती व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. निधी वाटप मतदारसंघ निहाय होते. त्यासाठी आमदार प्रस्ताव देतात.

कांद्याला चौदाशे रुपये भाव; जाणून घ्या आजचे दर एका क्लिकवर

शिवसेनेला बरोबर घेऊनच विविध समित्या स्थापन केल्या आहेत. शिवसेनेवर जाणूनबुजून अन्याय केला नाही. मात्र, ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे प्राबल्य आहे. त्या ठिकाणी त्या पक्षाची चलती असते. त्यामुळे जिल्हा नियोजन व इतर निधी वाटपाबाबत कोणावर तरी थोडाफार अन्याय होतच असतो. पुणे, नगर येथे राष्ट्रवादीचे तर कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे प्राबल्य आहे.

त्यामुळे शिवसेनेवर अन्याय होऊ शकतो. ठाणे व रायगड किंवा इतर जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे प्राबल्य असल्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर काही प्रमाणात निधी वाटपात अन्याय होतच असतो. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे सरकार चालविताना भांड्याला भांडे लागणारच असल्याचे सांगत त्यांनी निधी वाटपात थोडाफार अन्याय होत असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील महाविकास आघाडी अस्थिर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

खूनप्रकरणी पाच जणांना अटक

त्यासाठी केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांचा वापर भाजपच्या वतीने सुरूच असल्याचा आरोप पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केला. राम शिंदेंना टोमणा कोरोनामुळे दोन वर्षे चौंडीत कार्यक्रम झालेला नाही. भाजप सरकारच्या काळात अहिल्यादेवी होळकर जयंती कशी साजरी केली माहीत नाही. त्यांनी कार्यक्रम सर्वपक्षीय घेतला असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील सर्वपक्षीय कार्यक्रम करणार आहे. त्यांनी सर्वपक्षीय घेतला नसेल, तर त्यांना विचारण्याचा अधिकार नाही, असा टोला त्यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना लगावला आहे.

हेही वाचा

शिक्षक बँकेचे 10464 मतदार; अंतिम यादी प्रसिद्ध,13 जूनला प्रोग्राम?

इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग एक उत्तम पर्याय

बेळगाव : ‘एक मराठा, लाख मराठा’सारखा विराट मोर्चा काढू

Back to top button