संगमनेरात दीड वर्षात 179 अपघात 192 जणांचा मृत्यू

file photo
file photo
Published on
Updated on

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : वाहनांचा वाढता वेग, नियमांचे उल्लंघन, बेजबाबदारपणा यामुळे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संगमनेरात दिड वर्षात 179 अपघात झाले असून यात 192 जणांचा मृत्यु झाला. तर सर्वाधिक अपघात दुचाकीचे झाले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली. दळणवळण व्यवस्था सुखकर व जलद प्रवास व्हावा, यासाठी रस्त्यांची निर्मिती केली जात आहे.

हे रस्ते मात्र निरपराध नागरिकांचा बळी घेत असल्याचे वाढत्या अपघातावरुन स्पष्ट होते. नाशिक- पुणे महामार्ग तर अपघाताचे केंद्रच बनले आहे. महामार्गाने आत्तापर्यंत शेकडो जणांचा बळी घेतला आहे. दोन वर्षांत घडलेल्या अपघाताची माहिती एकत्रित करून अपघात कमी करण्यासाठी नागरिकांच्या मदतीने यावर उपाय योजना केल्या जाणार आहे. निरपराध नागरिकांचे प्राण वाचण्यासाठी तळमळ असल्याची भावना वाकचौरे यांनी बोलून दाखविली.

सन 2022 या वर्षी एकूण 100 अपघात, यात 108 मृत्यु, 2023 जून अखेर 79 अपघात यात 84 जणांचे मृत्यु झाले. तर सन 2022- 2023 जुन अखेर वेगवेगळ्या वाहनाचे झालेले अपघाताची आकडेवारी चिंताजनक आहे. टेम्पो 8, ढंपर 4, एस टी बस 2, रिक्षा 2, कन्टेनर 2, सर्वाधिक अपघात मात्र मोटारसायकल 139 झाले आहे. कार36 अपघात, ट्रॅक्टरचे 20 अपघात झाले. मालवाहू ट्रक 18, पिकअप 14 अशा वेगवेगळ्या वाहनांचा अपघातात समावेश आहे. अपघातांचा विचार करता यातील राज्य मार्गावर एकुण अपघात 2022 साली 41 झाले. यात मयत 43 जण. , 2023 (जून अखेर) एकूण अपघात 13 यात मयत 13 जण आहेत.

शहर हद्दीचा विचार करता नाशिक -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60, रायतेवाडी फाटा येथे 5 अपघात यात 5 जण मृत्यु. संगमनेर खुर्द कचरा डेपो अपघात 4 मयत 4. , राज्य महामार्गावर कोल्हार घोटी रस्ता मालपाणी इंडस्ट्रियल समोर चौफुली एकूण 6 अपघात झाले यात 6 जणांचे मृत्यु झाले. सन 2022 या वर्षी राज्य महामार्गावर एकूण 41 अपघात झाले त्यात मयत 43 जण मृत्यु झाले. सन 2023 (जून अखेर) एकूण 13 अपघात यात 13 मृत्यु पावले. तर नाशिक -पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकूण 41 अपघात झाले यात 44 जणांना प्राण गमवावे लागले . 2023 (जून अखेर) एकूण अपघात 42 झाले तर यात 43 जण मयत झाले आहेत,

तालुका पोलीस स्टेशन हद्दीत

नाशिक -पुणे महामार्ग चंदनापुरी घाट, आनंदवाडी परिसरात एकूण 6 अपघात झाले असून यात 6 जणांचा मृत्यू झाला, कर्हे घाटात एकुण 7 अपघात झाले व यात 7 जणांचा मृत्यू झाला. कोल्हार घोटी राज्य मार्गावर कोकणगाव गावात वळणावर 3 अपघात झाले व 3 जण मयत झाले. नांदूर शिंगोंटे ते लोणी राज्य मार्गावर तळेगाव दिघे बाजार तळाजवळ एकूण 8 अपघात झाले तर यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कासारे गाव वळणावर एकुण 3 अपघात झाले व 3 जणांना जीव गमवावा लागला आहे.

घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत नाशिक- पुणे महामार्ग खंदरमाळ शिवार खडी क्रेशर जवळ 4 अपघात झाले तर यात 4 जणांना जीव गमवावा लागला. बोटा माळवाडी शिवारात एकूण 9 अपघात झाले असून यात 9 जणांचा मृत्यू झाला. आंबी खालसा परिसरात 7 अपघात झाले यात 7 जणांचा मृत्यू झाला. डोळासणे शिवारात एकुण 5 अपघात झाले यात 5 जणांचा मृत्यु झाला.. तर माहुली घाटात 3 अपघात झाले यात 3 जण मरण पावले आहे.

महामार्ग निहाय अपघाताचा विचार करता राष्ट्रीय महामार्ग 60 नाशिक -पुणे महामार्ग सन 2022 या वर्षी एकूण 41 अपघात झाले असून यात 44 जण मयत झाले आहे. 2023 जून अखेर एकूण अपघात 42 झाले तर यात 43 जण मयत झाले. अपघात व यात मृत्यू व्यक्तीची संख्या चिंताजनक स्थिती आहे. मोटार सायकल अपघाताचे प्रमाण सर्वाधिक असल्याने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शिवाय यात कुटुंबातील कर्ता पुरूष व तरुणांचे मृत्यू प्रमाण अधिक आहे.

दिवसातील कुठल्या वेळेत अपघात अधिक होतात याचाही सखोल अभ्यास उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी केला असून पहाटे व सायंकाळी होणारे अपघाताचे प्रमाण अधिक आहे. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी कार्यक्षेत्रात खून, अत्याचार, हाणामार्‍या, चोर्‍या, दरोडे, जातीय तणाव या सारख्या वेगवेगळे घटनांवर अधिक लक्ष केंद्रीत करून ते कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

अपघात कमी करून जीव वाचवण्यावर अधिक भर दिला असून पोलिस यंत्रणेला शिस्त लावून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्याचा त्यांचा मानस असून अँक्शन प्लँन तयार केला आहे. यासाठी नगरपालिकेचे सहकार्य महत्वाचे असून कत्तलखाने वाढले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविणार असून कायद्दाचा धाक निर्माण केला जाणार असल्यांचे वाकचौरे त्यांनी सांगितले.

उपाययोजना राबविणार

एखादा खून झाला तर हळहळ व्यक्त केली जाते गुन्हेगारी पार्श्वभूमी आसल्याने अशा घटना घडतात. मात्र अपघातात मरण पावलेल्या विषयी फारशी संवेदना नसते. पोलिस , समाजही फारसा गंभीर नसतो. अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार नाहीसा होतो. याचा विचार करता अपघात कमी करण्यासाठी ज्या ठिकाणी अपघात आधिक होतात ते ठिकाण शोधून तेथे वाहनाचा वेग कमी करणे, सुचना फलक लावणे, वाहन चालकांना जागृत करणे या उपाय योजना राबविणार असल्याचे उ. वि .आ . सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news