नगर : श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावचे सुपुत्र सुभेदार ज्ञानेश्वर मोरे शहीद | पुढारी

नगर : श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावचे सुपुत्र सुभेदार ज्ञानेश्वर मोरे शहीद

काष्टी : पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावचे सुपुत्र शहीद सुभेदार ज्ञानेश्वर सखाराम मोरे (ता. एरंडोली,  श्रीगोंदा) यांना २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी वीरमरण आले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी येणार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आज २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या दरम्यान त्यांच्या मुळगावी एरंडोली तालुक्यातील श्रीगोंदा येथे होणार आहे.

शहीद सुभेदार ज्ञानेश्वर मोरे यांनी २३ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १८ वर्षे सेवा पूर्ण  केली होती. त्यानंतर दोन वर्ष अधिकची सेवा करून, पुन्हा सहा महिने ते सेवेत होते. यादरम्यान देशसेवा करत असताना त्यांना वीरमरण आले. वडील सखाराम गोविंद मोरे, आई सुलाबाई सखाराम मोरे, पत्नी सुरेखा ज्ञानेश्वर मोरे, मुलगा महेश ज्ञानेश्वर मोरे (वय २० वर्षे) मुलगी अर्पिता ज्ञानेश्वर मोरे (वय १५ वर्ष) तसेच भाऊ तुकाराम सखाराम मोरे असा त्यांच्या पश्चात परिवार आहे.

अंत्यसंस्कारावेळी पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त त्रिदल आजी-माजी सैनिक संघटना श्रीगोंदा तालुका व समस्त त्रिदल आजी-माजी सैनिक संघटना यांनी केले आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button