जळगावी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्त्यांना अटक | पुढारी

जळगावी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्त्यांना अटक

जळगाव पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आकाशवाणी चौकात करण्यात आला. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार करून राज्यपाल कोश्यारी यांची लवकरात लवकर हकलपट्टी करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतली.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध व्यक्त केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जळगाव दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत जैन हिल्स व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जैन हिल्स येथून कार्यक्रम आटपून राज्यपाल विद्यापीठाकडे दुपारी एक वाजता निघणार होते. याच रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Koo App

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार… ’तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’

Supriya Sule (@supriya_sule) 28 Feb 2022

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निषेध केला. राज्यपालांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

Koo App

त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती,त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली. आणि आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे,हे खरं नव्हे.

Supriya Sule (@supriya_sule) 28 Feb 2022

तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच या वक्तव्याची तक्रार महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे करणार असून त्यांना लवकरात लवकर या पदावरून हटवण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button