नगर : साखर कारखाने विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा | पुढारी

नगर : साखर कारखाने विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा

पारनेर : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रातील अनेक पक्ष आणि पक्षांच्या लोकांनी भ्रष्टाचार करून शेतकर्‍यांनी आपल्या भागभांडवल आणि जमिनी देऊन उभे केलेले साखर कारखाने कवडीमोल भावाने संगनमताने विकून 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांनी सहकार क्षेत्र मोडीत काढले असून, खासगीकरण वाढवले आहे. या सर्वांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी थेट केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हजारे यांनी केंद्रीय मंत्री शहा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राची स्थापना 1960 मध्ये झाली. महाराष्ट्रात 1980 पर्यंत 60 सहकारी साखर कारखाने होते. ते पूर्ण कार्यक्षमतेने चालू होते. त्यातून सहकार चळवळ इतकी समृद्ध होत गेली की, ती

फडणवीसांकडून शिवसेना संपविण्याचे राजकारण

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी बनली आणि हीच सहकार चळवळ पुढे देशासाठी पथदर्शी ठरली. कालांतराने सत्ताधारी पक्षांनी आणि राजकारण्यांनी अनेक सहकारी साखर कारखान्यांची व्यवहारिकता न तपासता मंजुरी दिली. त्यामागे त्यांचा उद्देश एवढाच होता की, साखर कारखाने उभारणीतील निधी आपल्या खिशात आणि परिवारात घालता यावा आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी तो वापरता यावा. या सर्वप्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Back to top button