यंदा भरपावसात निघणार वराती; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुहूर्तच नाही

यंदा भरपावसात निघणार वराती; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुहूर्तच नाही

[author title="प्रशांत भागवत" image="http://"][/author]
उमरखेड : यंदा भर पावसातही निघणार लग्नाची वरात निघणार आहेत. काळ कितीही पुढे गेला तरी, अजूनही मुहूर्त पाहूनच लग्न करण्याची परंपरा आजही कायम आहे. यंदा मार्च, एप्रिल महिन्यात एकही विवाह मुहूर्त नसल्याने अनेक इच्छुक उपवरवधुंचे लग्न रोखून ठेवले होते. मात्र आता विवाहासाठी उत्सुक असलेल्या जोडप्यांना जून महिन्यात विवाह उरकून घ्यावे लागणार आहेत. जून महिन्यात मुहूर्त भरपुर लग्न मुहुर्त आल्याने यंदा भर पावसातही धुमधडाक्यात वराती निघणार आहेत.

 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये प्रत्येकी सात मुहूर्त

विवाह करण्यासाठी इच्छुक जोडप्यांना यंदा जून महिन्यात ११ मुहूर्त आहेत. जून, जुलै नंतर थेट नोव्हेंबर महिन्यात विवाह करता येणार आहेत. पाच महिने मूहुर्त नसल्याने जुन महिन्यात लग्न उरकण्यासाठी केटरिंग तसेच मंगल कार्यालय बुक करण्याची नातेवाईकांकडून धावपळ सुरू आहे. जोडप्यांची जून महिन्याला अधिक पसंती आहे. मुहूर्त पाहूनच अनेक जण विवाहाची तिथी निश्चित करतात. २०२४ मध्ये जानेवारी फेब्रुवारी नंतर लग्नासाठी थेट मे महिन्यात मूहुर्त होते. मात्र मे महिन्यातील उकाडा पाहता यंदा जून महिन्यात मंगल कार्यालये फुल्ल झाले आहेत.
दरवर्षी जुन मध्ये शेतीचे कामाची लगबगअसते. त्यामुळे सहाजिकच उन्हाळ्यातच लग्न समारंभ आटोपण्यावर भर दिला जातो. परंतु यंदा उन्हाळ्यात मूहुर्त कमी होते. त्यातच अनेक जण निवडणुकीतही व्यस्त होते. आता जून महिन्यात लग्न तिथी असल्याने भर पावसाळ्यात लग्नाचे बार उडणार आहेत.

अशा आहेत लग्न तिथी

  •  जून २,३, ११, १३ १६, १९, २०, २८
  • जुलै ११, १३, १४, १५
  •  ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात मुहूर्तच नाहीत
  •  नोव्हेंबर- १२, १६, १७, १८ २४, २५, २७
  • डिसेंबर २,४, ५, ९, १०,११,१४

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news