SSC Result 2024 | दहावी गुणपत्रिकांचे आज शाळांमध्ये होणार वाटप

SSC Result 2024 | दहावी गुणपत्रिकांचे आज शाळांमध्ये होणार वाटप

सिडको, नाशिक : पुढारी वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकांचे मंगळवारी (दि.11) वाटप करण्यात येणार आहे. 27 मे रोजी दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला होता. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक शाळांना आज सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. सर्व माध्यमिक शाळांनी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे व स्थलांतर प्रमाणपत्रांचे वाटप करायचे आहे. त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य मंडळाने यंदा 1 ते 26 मार्चदरम्यान दहावीची लेखी परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेतली.

राज्य मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा दहावीचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात आला. दहावीचा निकाल यंदा 95.81 टक्के लागला आहे. दहावीसाठी 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा निकाल अगोदरच पाहिला आहे. परंतु गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात आज मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रवेश प्रक्रियेला गती येणार

दहावीच्या ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नव्हत्या. त्यामुळे अकरावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना गती मिळाली नव्हती. तसेच कागदापत्रांची तपासणी खोळंबली होती. आता, गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने संबंधित सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला गती येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news