Maratha Reservation|उपोषणाचा चौथा दिवस, जरांगे-पाटील उपचार न घेण्यावर ठाम | पुढारी

Maratha Reservation|उपोषणाचा चौथा दिवस, जरांगे-पाटील उपचार न घेण्यावर ठाम

पुढारी ऑनलाईन डेस्क: मनोज जरांगे-पाटील यांच्‍या बेमुदत उपोषणाचा आज (दि.११ जून) चौथा दिवस आहे. डॉक्टरांनी काळजी घेण्याल सांगितले असून देखील ते उपचार न घेण्यावर ठाम आहेत. आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास सरकारला याचा फटका बसेल, असा इशाराही जरांगे-पाटील (Maratha Reservation) यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण संदर्भातील सगेसोयरांच्या अंमलबजावणीच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. बेमुदत  उपोषणाच्या चौथ्या दिवशी देखील मी उपचार घेणार नाही, असे त्‍यांनी माध्यमांशी बोलताना (Maratha Reservation) सांगितले.

मराठा – कुणबी एकच आहे, असा अध्यादेश राज्‍य शासनाने काढावा, तसेच सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी तात्काळ करावी, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत पुन्‍हा एकदा बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असतानाही ते उपोषणावर ठाम आहेत. ८ जूनपासून त्‍यांनी बेमुदत उपोषणाला (Maratha Reservation) सुरूवात केली आहे.

समाजाला न्याय मिळवण्यासाठी उपोषण सुरू झाले आहे. उपोषणाला सरकारने जाणूनबुजून परवानगी नाकारली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की, ज्या लोकांनी निवेदन दिले आहे, ती लोक आमच्या लोकांना त्रास देत आहेत. शिवीगाळ करत आहेत.  प्रशासनाने कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नये. यावेळी मराठा समाजाने शांत राहावे, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी उपोषणादरम्यान केले आहे.

Back to top button