‘इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी द्यावी’, अमेरिकी खासदाराचे वक्तव्य

इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी द्यावी
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी द्यावी

पुढारी ऑनलाईन ; अमेरिकेच्या एका खासदाराने धक्‍कादायक विधान केले आहे. त्‍यांनी म्‍हंटलंय की, इस्‍त्रायलला गाझावर अनुबॉम्‍ब टाकण्याची परवानगी द्यायला हवी. इतकेच नव्हे तर या अमेरिकी खासदाराने अमेरिकेव्दारा जपानच्या हिरोशिमा आणि नागासकी या शहरांवर अणुबॉम्‍ब टाकण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. इस्रायलने ज्यू राष्ट्र म्हणून स्वत:ला वाचवण्यासाठी जे काही करावे लागेल ते करावे, असे या अमेरिकन खासदारांनी म्हंटले आहे.

अमेरिकन खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी म्‍हंटलंय…

  • इस्‍त्रायलला गाझावर अणुबॉम्‍ब टाकण्याची परवानगी मिळावी
  • इस्‍त्रायलने ज्‍यू राष्‍ट्र म्‍हणून स्‍वत:ला वाचवण्यासाठी सर्वकाही करावे
  • गाझातील नागरिकांच्या मृत्‍यूसाठी हमासला जबाबदार धरावे
  • इस्‍त्रायलाला बॉम्‍ब न देणाऱ्या अमेरिकन अध्यक्षांचाही निषेध

अमेरिकन खासदाराच्या वक्तव्याने जगाला धक्का बसला

अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम हे इस्रायलचे कट्टर समर्थक मानले जातात. इस्रायलला तीन हजार शक्‍तीशाली बॉम्बची डिलिव्हरी थांबवण्याच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. एका वृत्‍तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत लिंडसे ग्रॅहम यांनी म्‍हटलंय की, जेंव्हा आम्‍ही एक देश म्‍हणून जर्मनी आणि जपानच्या युद्धात पर्ल हार्बरचे नुकसान पाहिले, तेंव्हा हे युद्ध संपवण्यासाठी आम्‍ही जपानच्या हिरोशिमा आणि नागासकीवर अणुबॉम्‍ब टाकण्याचा निर्णय घेतला आणि तो एक योग्‍य निर्णय होता. त्‍यांनी म्‍हटलंय की, इस्‍त्रायललाही गाझामध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी अणुबॉम्‍ब दिला पाहिजे. ते हे युद्ध हारू शकत नाहीत.

अमेरिकेकडून जपानवर अणुबॉम्‍ब टाकल्‍याच्या निर्णयाचे केले समर्थन

लिंडसे ग्रॅहम यांनी म्‍हंटलंय की, अमेरिकेचे जपानच्या हिरोशिमा आणि नागासकीवर अणुबॉम्‍ब टाकणे योग्‍य होते. त्‍यामुळे ईस्‍त्रायलनेही सर्वकाही करावे. जेणेकरून तो एक ज्यू देश म्हणून टिकू शकेल. ते म्‍हणाले, गाझामध्ये नागरिकांच्या मृत्‍यूसाठी हमासला जबाबदार धरायला हवे. कारण हमासने सर्वसामान्य नागरिकांचा ढालीसारखा वापर केला. हमास जोपर्यंत आपल्‍याच नागरिकांचा ढालीसारखा हत्‍यार म्‍हणून वापर करत आहे तोपर्यंत मृतांची संख्या कमी होणे शक्‍य नाही. मी या आधी इतिहासात अशी कोणतेही युद्ध पाहिले नाही  जिथे आपल्‍याच नागरिकांचा जीव धोक्‍यात घातला असेल.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news