नाशिक : कुस्तीप्रेमींसाठी आज सातपूरला जिल्हा कुस्ती दंगल

नाशिक :  कुस्तीप्रेमींसाठी आज सातपूरला जिल्हा कुस्ती दंगल

सातपूर : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत मंगळवारी (दि. १४) सायंकाळी चार वाजता अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर नाशिक केसरी जिल्हास्तरीय भव्य कुस्ती दंगल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाही पहिलवान हेमंत घुगे व वैभव नागरे यांनी या कुस्ती दंगलीचे आयोजन केलेले आहे. कुस्त्यांसाठी कोल्हापूर, नगर, पुणे, सिन्नर, भगूर, चांदवड, धुळे, मालेगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, साकूर, पिंपळगाव बहुला ठिकाणचे नामांकित तालीम संघातील पहिलवान दाखल झाले आहे. पुणे येथील डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान शिवराज राक्षे व उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान योगेश पवार यांच्यात प्रमुख कुस्ती होणार आहे. महाराष्ट्र चॅम्पियन बाळू बोडके व डबल महाराष्ट्र चॅम्पियन गंगावेश तालीम कोल्हापूरचे सागर चौगुले यांच्यात द्वितीय कुस्ती होणार आहे. प्रथम पारितोषिक दोन लाख ११ हजार, तर द्वितीय पारितोषिक १ लाख अकरा हजार रुपये असणार आहे. दरम्यान, जिल्हाभरातील विविध तालीम संघांतील पहिलवानांसह परिसरातील नागरिकांनी या कुस्त्यांच्या दंगली सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक पहिलवान हेमंत घुगे व वैभव नागरे यांनी केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news