Salman Khan residence firing case | सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीने कोठडीत जीवन संपवले | पुढारी

Salman Khan residence firing case | सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीने कोठडीत जीवन संपवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अनुज थापन याने बुधवारी (दि.१) पोलीस कोठडीत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण त्याला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. (Salman Khan residence firing case)

पोलीस कोठडीत जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला संशयित आरोपी अनुज थापन याला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पंजाबमधून दोघा जणांना अटक केली होती. या प्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई याना मुंबई पोलिसांनी वाँटेड घोषित केले आहे. अनमोलच्या सांगण्यावरून दोन हल्लेखोरांना पिस्तूल व काडतुसे पुरवणार्‍या सुभाष चंदर आणि अनुज थापन या दोघांना मुंबई पोलिसांनी पंजाबमध्ये अटक केली होती.

अभिनेता सलमान खानच्या घराजवळील गोळीबार करण्याचा कट बिहारमध्ये शिजला आणि त्यासाठी कुख्यात बिष्णोई टोळीकडून त्यांना चार लाखांची सुपारी देण्यात आली होती, असे दोन्ही शूटर्सच्या चौकशीतून उघडकीस आले होते. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारासाठी त्यांना पैसे आणि हत्यार पाठविण्यात आले होते, ते त्यांना कोणी दिले याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या आरोपीने पोलीस कोठडीत जीवन संपवले आहे. (Salman Khan residence firing case)

हेही वाचा : 

Back to top button