मुंबई : अभिनेता सलमान खान आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यातील तब्बल १५ वर्षांच्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला. शेलार यांनी रविवारी दुपारी सलमान खान यांच्या निवासस्थानी जाऊन खान कुटुंबीयांची भेट घेतली. या लंच डिप्लोमसीचा फोटो सोशल मीडियावर टाकतानाच खान कुटुंबीयांच्या समाजकार्याचे शेलारांनी कौतुक केले. (Salman Khan News)
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन यांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले. या मतदारसंघातून शेलार यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा असतानाच शेलार यांनी सलमान खानशी घडवून आणलेली ही दिलजमाई भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. शेलारांनी राज्याच्या राजकारणात राहण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी वरिष्ठांकडून शेलारांच्या नावाचा आग्रह असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच शेलारांनी मतदारसंघातील राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यास सलमानपासून सुरुवात केल्याचे दिसते.
वांद्र्यातील मोठ्या वर्गावर विशेषतः अल्पसंख्याक पट्टयात सलमान खानचा थेट प्रभाव आहे. गरीब रुग्णांना आणि गरजूंना सलमान खानच्या संस्थांकडून मदतीचा हात दिला जातो.
हेही वाचा :