

पुढारी ऑनलाईन डेस्क: शिवसेना ठाकरे गटाचे (UBT) नेते अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) समन्स बजावले होते. कोविड-१९ खिचडी घोटाळ्याचा त्यांच्यावर आहे. दरम्यान आज (दि.८) ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहे. या संदर्भातील व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे. (Amol Kirtikar)
ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तिकर हे आगामी लोकसभा निवडणुकीतील मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार आहेत. शिवसेनेने (ठाकरे गट) अमोल कीर्तिकर यांना २७ मार्चला तिकीट दिले होते. नाव निश्चित झाल्यानंतर अवघ्या तासाभरात त्यांना ईडीचे समन्स मिळाले. यानंतर, त्यांना २९ मार्च रोजी दुसरे समन्स प्राप्त झाले, ज्यामध्ये ईडीने त्यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी आज ८ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले होते. (Amol Kirtikar)
हेही वाचा :