Unmesh Patil: भाजपकडून नाराज झालेले उन्मेष पाटलांचा आज ‘मातोश्री’वर होणार पक्षप्रवेश | पुढारी

Unmesh Patil: भाजपकडून नाराज झालेले उन्मेष पाटलांचा आज 'मातोश्री'वर होणार पक्षप्रवेश

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी राज्यात मोठमोठे भूकंप करीत असताना जिल्ह्यातील खासदार उन्मेश पाटील व करण पवार यांनी कमळाची साथ सोडून हाती मशाल धरली आहे. संपर्कप्रमुख संजय सावंत यांनीदेखील याबाबत दुजोरा दिला असून, बुधवारी (दि. ३) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटील यांचे तिकीट कापले आहे. पाटील यांच्याऐवजी भाजपने जळगावातून स्मिता वाघ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी उन्मेश पाटील हे शिवसेनेच्या ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र पाटील हे बुधवारी (दि. ३) शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याचे संजय सावंत यांनी सांगितल्याने आता वाघ विरुद्ध पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे. सकाळी ११ ते १ या दरम्यान उन्मेष पाटील हे मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेतील, अशी सुत्रांकडून कळत आहे. पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवारही ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.

स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून उन्मेश पाटील नाराज होते. वाघ यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उन्मेश पाटलांनी पक्षाचा कार्यक्रम किंवा प्रचाराला उपस्थिती लावली नसल्याची चर्चा आहे. भाजपकडून पाटील यांच्या मनधरणीचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र पाटील हे बुधवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती मशाल घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

Back to top button