Maharashtra politics : अशिष शेलारांनी घातलं गाऱ्हाणं, “त्यांचीच पनवती…” | पुढारी

Maharashtra politics : अशिष शेलारांनी घातलं गाऱ्हाणं, "त्यांचीच पनवती..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय नौदलाचा मानबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ यंदाचा नौदल दिन साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संदर्भाने भाजप नेते आशिष शेलार यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,”नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत जे आपल्या मालवणला भेट देत आहेत.” तसेच गाऱ्हाणं घालत विरोधी पक्षावरही निशाणा साधला आहे. (Maharashtra politics)

Maharashtra politics : बडबड करतलो तो राऊतांचो झिल, पत्रकार पोपटलाल

आशिष शेलार यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत जे आपल्या मालवणला भेट देत आहेत. आतापर्यंत एवढे पंतप्रधान झाले पण केोणी साधी इच्छा सुद्धा व्यक्त केलेली नाही. त्याचबरोबर त्यांनी विरोधीपक्षावरही निशाणा साधत गाऱ्हांण घातलं आहे. वाचा अशिष शेलार यांची पोस्ट यांच्याच शब्दात

“मा. नरेंद्र मोदी हे सगळ्यात पयले पंतप्रधान आसत जे आपल्या मालवणाक भेट देत हत. नायतर आजतागायत इतके पंतप्रधान झाले हयसर कोणी एकान सुद्धा इच्छा आपणांक भेटूची इच्छा सुद्धा दाखवल्यान नाय. आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींका शिवाजी महारांजांच्या रणनिती आणि आरमाराचा कौतुक म्हणान त्यांनी भारतीय नौदलाच्या नवीन झेंड्याचा डिझाईन महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन तयार केल्यानी असा. आपल्या भारताच्या नौसेनेच्या एका लढाऊ बोटीक “मालवण” असा नाव दिल्यानी असा.आपल्या मालवानातल्या छ. शिवाजी महाराज्याच्या राजकोट किल्ल्यात भव्य् अश्या पुतळ्याचा अनावरण होतला हा म्हणजे देशात पयल्यांदा आरमार उभारुची दूरदृष्टी असलेल्या आपल्या राजाक दिलेली ही मानवंदनाच असा.

बडबड करतलो तो राऊतांचो झिल… पत्रकार पोपटलाल…आता पंतप्रधानांचे आभार मानायचे सोडून कायतरी खुसपाट काढून वडाची साल पिंपळाक लावतले. बाकी ह्यांका काम काय हा दुसरा?
धाक नाय दारारो, फुकटचो नगारो! म्हणान आज गाऱ्हांना घालूनच टाकूया आणि ही काय ती इडा पिडा मागे लागली हा ती पळवून लावया!
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या,
बारा बावडीच्या,
बारा नाक्याच्या,
बारा गल्लीच्या,
बारा शहरांच्या देवा होय म्हाराज्या..
आई भराडी आणि रवळनाथा महाराज्या…
उबाठा वडाची साल पिंपळाक लावतत. तोंडाक येता ता बोलत सुटले आसत, त्यांका वाईच अक्कल दी रे महाराज्या. इंडिया आघाडी करून जनतेक लुटुचो डाव करतत त्यांका सगळ्यांचा तुझो हिसको दाखव रे महाराज्या.जनसेवक पंतप्रधानांचो अपमान करतत.. त्यांचा काय ता बघून घे रे महाराज्या! त्यांचीच “पनवती” त्यांच्याच घशात घाल.. रे महाराज्या..!”

हेही वाचा 

Back to top button