Holi 2024 | हुताशनी पौर्णिमा; जाणून घ्या होळीचा मुहूर्त आणि होळी साजरी करण्यामागचे वैज्ञानिक कारण | पुढारी

 Holi 2024 | हुताशनी पौर्णिमा; जाणून घ्या होळीचा मुहूर्त आणि होळी साजरी करण्यामागचे वैज्ञानिक कारण

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. होळी आली की होळीसाठी लाकडं गवर्‍या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात. (Holi 2024)

जे जुने आहे ते कालबाह्य आहे, अमंगल आहे. त्याचा जाळून नाश करायचा. नव्याचा, चांगल्याचा, उदात्ततेचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. असा होळीचा काळानुरूप अर्थ आहे. होळी आपल्याला त्याग, समर्पण शिकवते. (Happy Holi 2024)

आपल्या मनातील द्वेष, राग, लोभ, मत्सर यासारखे दुर्गूण यासारखे दूर करून म्हणजे होलीकामध्ये दहन करून प्रेम, सद्भाव, वात्सल्य, मांगल्य, आनंद, समाधान, करूणा अशा मानवतेच्या गुणांचा प्रत्येकाने अंगिकार करावा. यासाठीच हा होलिकोत्सोव आपण सर्वांनी साजरा करायला हवा. (Holi 2024)

 Holi 2024 : होळी साजरी करण्यामागचे वैज्ञानिक कारण

होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ. थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सूस्त झालेले असते. यामुळे शारिरीक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सूस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठी होळी साजरी केली जाते.

होळी आणि चंद्रग्रहण

24 मार्च 2024 चे चंद्रग्रहण छायाकल्प असल्याने अशा ग्रहणाचे कोणतेही नियम पाळावयाचे नसतात. भारतात हे छाया कल्प चंद्र ग्रहण दिसणार नाही , तसेच भारताबाहेर काही ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे, पण त्याचे नियम पाळावयाचे नाहीत. 24 मार्च रोजी रविवारी होळी नेहमी प्रमाणे सूर्यास्त झाल्यावर प्रदोष काळात म्हणजे साधारण पणे रात्री 9 पर्यंत पेटवावी आणि होळीचा सण साजरा करावा, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

हेही वाचा: 

Back to top button