Lok Sabha Election 2024 | महायुतीचे ठरले : शिंदेंना १३ तर अजितदादांना ४ जागा; भाजप ३१ जागांवर लढणार? | पुढारी

Lok Sabha Election 2024 | महायुतीचे ठरले : शिंदेंना १३ तर अजितदादांना ४ जागा; भाजप ३१ जागांवर लढणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकींसाठी महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. या सूत्रानुसार भारतीय जनता पक्ष सर्वाधिक ३१ जाग लढवणार आहे. तर शिवसेना (शिंदे) १३ जागांवर निवडणूक लढवेल. तर राष्ट्रवादी (अजित पवार) ४ जागा लढणार आहे. (Lok Sabha Election 2024)

ही बातमी NDTVने दिलेली आहे. अजित पवार यांना बारामती, रायगड, शिरुर, परभणी हे चार मतदारसंघ मिळणार आहेत. असे असले तरी अजित पवार अजून काही जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत, असे या बातमीत म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)

बारामती हा पवार कुटुंबाचा गड आहे. येथून पवार कुटुंबीयांनी सातत्याने निवडणुका जिंकल्या आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर बारामतीत पवार कुटुंबीयांतच लढत होणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होईल. तर रायगडमधून खासदार सुनील तटकरे अजित पवारांचे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून अनंत गीते निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

शिरुर मतदारसंघातून अजित पवारांच्या गटाकडून प्रदीप कंद किंवा माजी खासदार अढळराव पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर परभणीतून राजेश विटेकर यांना अजित पवारांकडून तिकीट मिळवण्याची शक्यता आहे. परभणीत खासदार संजय जाधव उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.

हेही वाचा 

Back to top button