ठरलं ! कर्जत जामखेड विधानसभा अजित पवार गटच लढविणार : उमेश पाटील | पुढारी

ठरलं ! कर्जत जामखेड विधानसभा अजित पवार गटच लढविणार : उमेश पाटील

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारणी येत्या आठ दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. तसेच विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडेच रहाणार आहे आशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. उमेश पाटील हे काल काल मंगळवार दि १२ रोजी जामखेड येथे रत्नदीप चे डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात आंदोलनकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते.

यावेळी जामखेड येथील विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्याताई सोनवणे, बबन कानडे, आकाश साळवे, नगरसेवक महेश निमोणकर, बापुसाहेब शिंदे, पै. राजू शेख, गोरे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, विद्यमान आमदाराचा पराभव आमचाच उमेदवार करणार एक सक्षम उमेदवार देत कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी आमचे नेते अजित पवार यांच्या माध्यमातून भरीव निधी दिला जाईल असे सांगितले. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशीच लढत होईल असे चित्र दिसत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात आमचे नेते अजित पवार स्वतः लक्ष घालणार आहेत. एक सक्षम उमेदवार देऊन विजयश्री खेचून मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढू असे सांगितले. येत्या आठ दिवसात जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारीनी जाहीर केली जाईल असे सांगितले.

आमदार निलेश लंके यांच्या विषयी विचारले असता ते म्हणाले लंके हे लोकप्रिय आमदार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे कार्य चांगले आहे. पक्ष कोणाला उमेदवारी देईल ते पाहू परंतु लंके हे सर्व सामान्य व लोकांच्या मनातील उमेदवार आहेत मात्र ते राजकारणा पेक्षा जास्त महत्व हे समाजकार्याला देत आहेत. आमच्या सोबत काम करत आसताना कोणीही कोणाच्या दबावाला बळी पडायचे नाही. जर कोणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला तर अजित पवार गट त्याला जशास तसे उत्तर देईल असे देखील मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा

Back to top button