दै. पुढारीच्या पाठपुराव्याला यश : डिफेन्स क्लस्टर हब उभारणीतील अडचणी दूर

दै. पुढारीच्या पाठपुराव्याला यश : डिफेन्स क्लस्टर हब उभारणीतील अडचणी दूर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दैनिक 'पुढारी'च्या वृत्ताची दखल घेत नाशिक मध्य मतदारसंघातील भाजप आमदार. प्रा. देवयानी फरांदे यांनी उद्योगमंत्री उदय सांमत यांची भेट घेतल्यानंतर अखेर नाशिकमधील प्रस्तावित डिफेन्स क्लस्टर हब (Defense Innovation Hub) उभारणीतील अडचणी दूर झाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत या प्रकल्पाची घोषणा केली जाणार असून, स्काय बसचा प्रकल्पही राबविला जाणार असल्याचे आश्वासन सामंत यांनी दिल्याची माहिती आ. फरांदे यांनी दिली आहे.

नाशिकमद्ये डिफेन्स क्लस्टर हब (Defense Innovation Hub) उभारण्याची घोषणा तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली होती. त्यामुळे नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या असताना विद्यमान उद्योगमंत्री सामंत यांनी तीन दिवसांपूर्वी पुणे, रत्नागिरी, शिर्डी आणि नागपूर या चार ठिकाणी डिफेन्स क्लस्टर हब उभारण्याची नवी घोषणा केली. यामुळे नाशिकमध्ये डिफेन्स क्लस्टर उभारण्याची डॉ. भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी केलेली घोषणा हवेत विरल्याचे वास्तव मांडत दैनिक 'पुढारी'ने उद्योजकांमधील नाराजी दि.२६ रोजीच्या अंकात मांडली होती. या वृत्ताची आ. फरांदे यांनी दखल घेत सामंत (Industries Minister Uday Samant) यांची भेट घेतली. एम. एस. एम. ई डिफेन्स एक्स्पो (MSME Defense Expo), पुणे येथील उद्घाटन कार्यक्रमात उद्योगमंत्री सामंत यांनी पुणे, रत्नागिरी, शिर्डी व नागपूर येथे संरक्षण साहित्य उत्पादन हब डिफेन्स क्लस्टरची घोषणा केली. त्यामुळे नाशिकवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती. आमदार फरांदे यांनी सदर बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशीदेखील चर्चा केली. यानंतर नाशिक येथील संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर) तयार करण्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत.

नाशिकमधील प्रस्तावित डिफेन्स क्लस्टर हबच्या (Defense Innovation Hub) उभारणीतील तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, येत्या दोन-तीन दिवसांत यासंदर्भातील घोषणा केली जाणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. – प्रा. देवयानी फरांदे, आमदार, भाजप.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news