NCP Sharad Pawar Symbol | उद्या रायगडवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ‘तुतारी’ वाजणार

NCP Sharad Pawar Symbol
NCP Sharad Pawar Symbol
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर दावा सांगितला. त्यानंतर केंद्रीय निवडणुक आयोगासमोर कागदपत्रे आणि पुराव्यांवरून खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार यांचीच असल्याचा निकाल देण्यात आला. पुढे अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ नाव आणि चिन्ह बहाल करण्यात आले.  त्यानंतर आयोगाने शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार' असे नवीन नाव आणि 'तुतारी' हे नवीन चिन्ह दिले. केंद्रीय निवडणुक आयोगाने दिलेल्या याच चिन्हाचे उद्या (दि.२४) किल्ले रायगड येथे अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक्स पोस्ट करत दिली आहे. (NCP Sharad Pawar Symbol)

NCP Sharad Pawar Symbol: 'तुतारी वाजवणारा माणूस' चिन्हाचे उद्या अनावरण

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार' या पक्षाने पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आता अवघा देश होणार दंग,आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग! 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार'ला मिळालेल्या 'तुतारी वाजवणारा माणूस' या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा उद्या, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. चला, छत्रपती शिवरायांच्या साथीने तुतारीचा नाद दाही दिशा घुमवूया! असे आवाहन शरद पवार गटाने केले आहे. (NCP Sharad Pawar Symbol)

 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज- शरद पवार गटाची पोस्ट चर्चेत

शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार' या पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह देण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत आता येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला आता हे चिन्ह वारण्याचे आदेश देण्यात आले आहे. 'तुतारी' पक्ष चिन्ह मिळताच "दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!" अशा आशयाची पोस्ट शरद पवार गटाच्या वतीने सोशल मीडियावर करण्यात आली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news