२९ नोव्हेंबरपासून पासून राज्यात पुन्हा पावसाची शक्यता | पुढारी

२९ नोव्हेंबरपासून पासून राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात चार दिवसांच्या खंडानंतर २९ नोव्हेंबर पासून पुन्हा पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

हवाई मालवाहतुक होणार सुसाट

बंगालच्या उपसागरासह श्रीलंका किनारपट्टीवर वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच दक्षिण अंदमानात २९ नोव्हेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण व मध्य महाराष्ट्रात २८ ते ३० नोव्हेंबर या कालवाधित ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

Shakti Mills Gang Rape Case: शक्‍ती मिल सामूहिक बलात्‍कार प्रकरणातील तिघा दोषींना जन्‍मठेप

उकाडा वाढला..

राज्यात सध्या किमान तापमानात वाढ झाल्याने दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत आहे. बहुतांश शहराचे किमान तापमान १९ ते २१ अंशावर स्थिर आहे. यंदा नोव्हेंबर संपत आला तरीही थंडी न पडल्याने बळीराजा चिंतेत आहे.

सराईत सोनसाखळी चोरट्यासह चोरीचा माल घेणारा सराफ जेरबंद

गुरुवारचे किमान तापमान

मुंबई २५, रत्नागिरी २४.७, डहाणू २५ पुणे १८.७, नगर १९.५, कोल्हापूर २१, महाबळेश्वर १७.१ (सर्वात कमी ), नाशिक १९.६, औरंगाबाद १९, परभणी १९.६, नांदेड २१, अकोला २०.७, अमरावती १७.५, बुलढाणा १९.४, चंद्रपूर २०.६, गोंदिया १८.८, नागपूर १९, वाशिम २०.६, वर्धा १९.२

आजपासूनच लागा तयारीला ! एक डिसेंबरपासून शाळेची घंटा वाजणार

Back to top button