मराठा समाज सर्वेक्षण : अटी, संदर्भ बदलले जाण्याची शक्यता | पुढारी

मराठा समाज सर्वेक्षण : अटी, संदर्भ बदलले जाण्याची शक्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात येत्या बुधवारी (दि. 27) बैठक होणार आहे. त्यात मराठा समाजाच्या सर्वेक्षणातील अटी व संदर्भ (टर्म्स ऑफ रेफरन्स) बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. 22 डिसेंबर रोजी पुण्यातील नियोजित बैठक अचानकपणे रद्द करून ती नागपूर येथे 15 डिसेंबरला घेण्यात आली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोग काम करत आहे. निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. मराठा समाजाचे सर्वेक्षण करताना अटी व संदर्भ या बैठकीत बदलले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आयोगाने चार उपसमित्या गठित केल्या आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारला आयोगाचा अहवाल सादर होणार असून, सर्वेक्षणासाठी आयोगाने 60 प्रश्न निश्चित केल्याचे सांगण्यात आले. आरक्षण देताना कोणत्याही समाजाचे मागासलेपण सिद्ध करावे लागते. त्यासाठी अटी आणि संदर्भ हे घटक निर्णायक स्वरूपाचे ठरतात. पुण्यातील बैठक त्यामुळेच महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा :

Back to top button