महत्त्वाची बातमी ! जेईई मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल

महत्त्वाची बातमी ! जेईई मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएकडून जेईई मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र विषयांतील अनेक पाठ्यक्रम वगळले असून, सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. मॅथेमॅटिक्स इंडक्शन, मॅथेमॅटिकल रिझनिंग आणि थ्री डायमेन्शनल भूमितीमधील काही विभाग गणित विभागातून काढून टाकण्यात आले आहेत, तर भौतिकशास्त्राने संप्रेषण प्रणाली आणि त्रिमितीय भूमितीमधून काही भाग काढून टाकला आहे. स्टेट्स ऑफ मॅटरसारखे विषय काढून टाकल्याने रसायनशास्त्राला सर्वाधिक फटका बसल्याचे विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे.

संबंधित बातम्या :

गेल्या 3 वर्षांत सीबीएसई, एनसीईआरटी तसेच अन्य राज्य मंडळांनी नववी ते बारावीचा अभ्यासक्रम कमी केला, पण जेईई मुख्य अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नव्हता. यासंदर्भात एनटीएने देशभरातील मंडळांशी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापना केली होती. यानंतर एनटीएने बदलेला अभ्यासक्रम जाहीर केला आहे. या बदलेल्या अभ्यासक्रमाबरोबर परीक्षेच्या नोंदणीलाही सुरुवात केली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ही नोंदणी असणार आहे. एनटीएने वगळलेल्या अभ्यासक्रमांत रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयातील बहुतांश टॉपिक्स काढून टाकण्यात आले आहेत.

प्रायोगिक कौशल्यातून येत असलेल्या प्रश्नांचेही काही टॉपिक काढून टाकण्यात आले आहेत. रसायनशास्त्रातील स्टेटस ऑफ मॅटर, सरफेस केमिस्ट्री, एस- ब्लॉक एलिमेंट, हायड्रोजन, पर्यावरण रसायनशास्त्र, पॉलीमर्स, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ जनरल प्रिन्सिपल्स अ‍ॅण्ड प्रोसेसेस ऑफ आयसोलेशन ऑफ मेटल्स तसेच थॉमसन अ‍ॅण्ड रदरफोर्ड अ‍ॅटॉमिक मॉडल्स अ‍ॅण्ड देयर लिमिटेशन्स आदी प्रकरणे कमी केली आहेत. तर गणित विषयातून मॅथमेटिकल इंडक्शन्स मॅथमेटिकल रीजनिंग हे टॉपिक्स काढून टाकण्यात आले आहेत. थ—ी डायमेंशनल ज्योमेट्री मधीलही काही प्रकरणे हटवली आहे.

यासंदर्भात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या अभ्यासक्रमातील कपातीमुळे उद्भवला आहे. जेईई मुख्य अभ्यासक्रमात हे बदल सीबीएसईने कमी केलेल्या अभ्यासक्रमाशी जुळवण्यासाठी आहेत. यानंतर जेईई अ‍ॅडव्हान्स देत असलेल्या विद्यार्थ्यांना कमी केलेला बहुतांश अभ्यासक्रमांचा अभ्यास करावा लागणार आहे.

तीन दिवस अगोदर अ‍ॅडमिट कार्ड

या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी क्षशशारळप.पींर.पळल हे संकेतस्थळ आहे. अर्जाची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. जेईई मुख्य परीक्षेचे पहिले सत्र 24 जानेवारी 2024 आणि 1 फेब—ुवारी 2024 रोजी तर दुसर्‍या सत्रातील परीक्षा 1 एप्रिल 2024 आणि 15 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. परीक्षा केंद्रांची माहिती जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात दिली जाणार आहे. परीक्षेच्या अगोदर तीन दिवस अ‍ॅडमिट कार्ड दिले जाणार असल्याचे एनटीएने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news