चिंतेची बाब ! राज्यातील 11 जिल्ह्यांत पावसाची स्थिती बिकट | पुढारी

चिंतेची बाब ! राज्यातील 11 जिल्ह्यांत पावसाची स्थिती बिकट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी संपत आला आहे. तरी देखील सर्वच भागांत पाऊस अतिशय कमी असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यानुसार ऑगस्टअखेर राज्यातील 36 पैकी 11 जिल्हे अवर्षणाच्या छायेत आहेत; तर 21 जिल्ह्यांत सर्वसाधारण पडला आहे. मात्र, 4 जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

यंदा राज्यात ऑगस्टच्या तिसर्‍या आठवड्यात राज्यातील अकरा जिल्हे अवर्षणाच्या छायेत असून, एकवीस जिल्ह्यांत साधारण पाऊस पडला आहे. राज्याची सरासरी 741.1 मी.मी.ची आहे. त्यापैकी 692.7 मी.मी पाऊस यंदा ऑगस्टअखेर झाला आहे. ही सरासरी यंदा कोकण व विदर्भातील पावसामुळे वाढली आहे. मध्य महाराष्ट्राची सरासरी मराठवाड्यापाठोपाठ आहे. उत्तर महाराष्ट्रातही कमी पाऊस झाला आहे. सर्वांत कमी पाऊस मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात झाला असून, तेथे तब्बल उणे 50 टक्के इतकी तूट आहे. त्या पाठोपाठ मध्य महाराष्ट्रातील सांगली उणे 43 टक्के, सातारा उणे 35 टक्के इतकी तूट आहे.

कोकण विभाग सरस
फक्त कोकण विभागात सरासरीपेक्षा 9 टक्के जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र (-19 टक्के), मराठवाडा (-15 टक्के) तर विदर्भ (-7 टक्के) इतका पाऊस झाला आहे. कोकण विभागातच यंदा सरासरीपेक्षा किंचित जास्त पाऊस झाला आहे. मात्र, नेहमी सरासरी कोकणापाठोपाठ असणारा मध्य महाराष्ट्र सरसरीत सर्वांत मागे पडला आहे.

साधारण पावसाचे 21 जिल्हे
– भंडारा (-3), बुलडाणा ( -18), चंद्रपूर (-2), गडचिरोली (-14), गोंदिया (सरासरी इतका), नागपूर (-4), वर्धा (-7), वाशिम (-14), यवतमाळ (11), लातूर (-3), धुळे (-19), जळगाव (-10), कोल्हापूर (-13), नंदुरबार (-8), नाशिक (-8), पुणे (-15), मुंबई (-3), रायगड (-14), रत्नागिरी (-5), सिंधुदुर्ग (-4), धाराशिव (-19).

अतिवृष्टीचे जिल्हे
नांदेड (31), पालघर (24), मुंबई उपनगर (32), ठाणे (26)

अवर्षणाच्या छायेतील अकरा जिल्हे (टक्के)
जालना (-50), छत्रपती संभाजीनगर (-32), बीड (-29), हिंगोली (-32), परभणी (-25), अकोला (-26), अमरावती (-30), सांगली (-43), सातारा (-35), सोलापूर (-24), नगर (-31).

हेही वाचा :

महत्त्वाची बातमी ! तलाठी पदाच्या परीक्षा केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी

Hydrogen Bus : देशात पहिली हायड्रोजन बस धावणार लेहमध्ये

Back to top button