Hydrogen Bus : देशात पहिली हायड्रोजन बस धावणार लेहमध्ये | पुढारी

Hydrogen Bus : देशात पहिली हायड्रोजन बस धावणार लेहमध्ये

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : Hydrogen Bus : भारतात सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रथमच हायड्रोजन इंधनाचा वापर सुरू होणार असून, देशातील पहिली हायड्रोजन बस लेहमध्ये धावणार आहे. पाच बसेसच्या ताफ्यातील पहिली बस नुकतीच लेहमध्ये दाखल झाली असून, लवकरच या सेवेला प्रारंभ होणार आहे.

जगातील सर्वात उंचावर असलेल्या आणि अतिशीत तापमान असणार्‍या लेह लडाख हा पर्यावरणद़ृष्ट्या अत्यंत नाजूक व संवेदनशील भाग समजला जातो. त्यामुळे तेथे जीवाश्म इंधनाचा वापर कमी करत पर्यायी व हरित इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एनटीपीसी अर्थात नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लेहला पाच हायड्रोजन बसेस पुरवणार आहे. लेह लडाखचे परिवहन विभाग या बसेस चालवणार आहेत. राज्य परिवहन महामंडळ त्यासाठी इंधन भरण्याची सुविधा व ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी लागणारा 1.7 मेगाव्हॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पासाठी लेह प्रशासनाने शहरात साडेसात एकर जागा दिली आहे. (Hydrogen Bus)

अशोक लेलँड कंपनीने या बस तयार केल्या असून एका बसची किंमत अडीच कोटी रु. आहे. लेह शहरात ही बससेवा सुरू होणार असून, सध्या तरी डिझेलवर चालणार्‍या बसएवढेच भाडे या नवीन बसला आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Hydrogen Bus : पहिली बस दाखल

15 ऑगस्ट रोजी या सेवेचे उद्घाटन करण्याचे ठरले होते; पण देशातील पूरस्थिती व भूस्खलनामुळे ही बस लेहला पोहोचण्यास उशीर झाला. आता आगामी काही दिवसांत ही बस सेवा सुरू होईल.

हे ही वाचा :

Back to top button