Rain Update : राज्यात विदर्भात मुसळधार; अन्यत्र मध्यम पाऊस होणार | पुढारी

Rain Update : राज्यात विदर्भात मुसळधार; अन्यत्र मध्यम पाऊस होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सुमारे पंधरा ते वीस दिवसांपासून थांबलेला पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भातच त्याचे प्रमाण जास्त असून राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेला मान्सूनचा ट्रफ (पावसाचा आस) मागील आठवड्यापासून पुन्हा मूळस्थानी सरकला आहे. सध्या हा ट्रफ गंगानगर, नारनूल, सतना या भागांत आहे. तर उत्तर छत्तीसगडच्या भागावर सध्या कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. तो पुढील 24 तासांत मध्य प्रदेशकडे सरकणार आहे.

याबरोबरच छत्तीसगड ते उत्तर-पूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. दरम्यान, या दोन कमी दाबाच्या प्रभावामुळेच हिमाचल प्रदेशच्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाली आहे. आता मात्र हा कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशकडे सरकला आहे. त्यामुळे या भागातील पाऊस पूर्णपणे कमी होईल आणि महाराष्ट्रातील विदर्भात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात पाऊस वाढणार आहे. दरम्यान, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र् आणि मराठवाडा या भागांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पुढील पाच दिवस पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा:

बुडालेली द्वारका पुन्हा जिवंत होतेय !

चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; पाठवला बरनॉल

Back to top button