Sakshna Salgar : लबाडाला हबाडा बीड जिल्हा देणार; सक्षणा सलगरांचा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल

Sakshna Salgar : लबाडाला हबाडा बीड जिल्हा देणार; सक्षणा सलगरांचा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडमध्ये सभा सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या सक्षणा सलगर यांनी आक्रमक भाषण करत अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्या म्हणाल्या, जे फलक लावतायात ना आमच्या माणसाला साथ द्या, आमचा माणूस कामाचा, आता कामाचा माणूस की लबाड हे जनताच ठरवेल. लबाडाला हबाडा बीड जिल्हा देणार. भलेभले हबाडा घेऊन घरी बसणार आहेत, हे सांगण्यासाठी ही सभा आहे, असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, पवार साहेब आम्ही तरुण मंडळी आहोत. हे रणांगण आहे. या रणांगणात तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण का भारवला आहे? 65 वर्षाचा सह्याद्री आम्ही असा तसा रिटायर होऊ देणार नाही, आज ऐतिहासिक अशी सभा बीड जिल्ह्यात होत आहे. मी लहानपणापासून ऐकलय पवारसाहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा म्हणून ओळखतात. सगळे पवारसाहेबांच वय काढतात, पण एका कवीने लिहून ठेवलय की, "आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. विचार बाकी आहे" असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

निवडणूका येतात निवडुका जातात, महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या हाती द्यायची नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदी-शाह यांना धडा शिकवला, तसाच धडा हा वीरांचा-शूरांचा महाराष्ट्र शिकवेल, या मातीतील माणूस कणखर आहे. हा स्वाभिमान, अस्मिता जपण्यासाठी पवारांना संधी द्यायची आहे. भाजपाला मला सांगायच आहे की, आजपर्यंत ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत होता. त्या सगळ्या लोकांना घेऊन स्वच्छ करुन टाकलत. सबकी पसंद भाजप असं झालय. पण मी एक गोष्ट सांगते, गुजरात महाराष्ट्राला चालवत असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही. आमचा सह्याद्री अजून जिवंत आहे. दिल्लीला धडकण्याची ताकत महाराष्ट्राला शिवरायांनी, आंबेडकर, शाहू -फुलेंनी दिलीय असेही सलगर म्हणाल्या.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news