Accident in Maharashtra : राज्यात दिवसाला ४० जण रस्ते अपघाताचे बळी; अपघात रोखण्याचे आव्हान | पुढारी

Accident in Maharashtra : राज्यात दिवसाला ४० जण रस्ते अपघाताचे बळी; अपघात रोखण्याचे आव्हान

मुंबईः पुढारी वृत्तसेवा : राज्यात नवीन वाहनांची भर पडतेय, त्याचप्रमाणे रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पड़णार्‍यांची संख्या देखील वाढते आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यात ३ हजार ५४८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यु झाला आहे. म्हणजेच दिवसाला अंदाजे ४० जणांचा जीव विविध अपघातांत जात आहे. परिणामी हे वाढते अपघात आणि बळी रोखण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागासमोर आहे. (Accident in Maharashtra)

Accident in Maharashtra : अपघातांमध्ये महाराष्ट्र तिसरा 

अपघातांमध्ये महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार, वाहतूक पोलिस, परिवहन विभाग आणि विविध सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याला यश येताना दिसत नाही. राज्यात दिवसाला ४० हजाराहून अधिक नवीन वाहनांची भर पडत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. जानेवारी महिन्यात राज्यात २१५६ अपघात झाले असून त्यामध्ये १ हजार ५१ जणांचा बळी गेला. फेब्रुवारी महिन्यात २२५० अपघातांमध्ये १२२९ जणांनी तर मार्च महिन्यात २३३३ अपघातांमध्ये १२६८ जणांचा मृत्यू झाला .

प्रमाण घटले पण मृत्यू वाढले

मागील वर्षीच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण सध्या १३ टक्क्यांनी घटले आहे. मात्र अपघातात बळी जाणार्‍यांची संख्या चिंताजनक आहे.

रस्ता सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर अ‍ॅक्शन प्लान

वाढत्या अपघातांची मृत्युच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने जिल्हास्तरावर अ‍ॅक्शन प्लान तयार केला आहे. तसेच अपघात कशामुळे होतात, ब्लॅकस्पॉक याचा शोध घेण्यात येत आहे.

अपघाताची कारणे

वेग जास्त. बेदकारपणे गाड्या चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळणे.

वर्ष ————–अपघात ————मृत्यु
२०१९—————३२,९२५—————१२,७८८
२०२०————-२४,९७१——————-११,५६९
२०२१————-२९,४७७—————-१३,५२८
२०२२————३३,०६९—————–१४,८८३
जाने-मार्च २३—६,७३९———–३ ,५४८

हेही वाचा 

Back to top button