Rahul Gandhi Visit to Manipur : राहूल गांधी यांच्या मणिपूर दौऱ्यातील अडथळा दूर; हेलिकॉप्टरने चुरचंदपूरला रवाना

Rahul Gandhi Visit to Manipur : राहूल गांधी यांच्या मणिपूर दौऱ्यातील अडथळा दूर; हेलिकॉप्टरने चुरचंदपूरला रवाना
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क :  काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. आज (दि. २९) सकाळी इंफाळच्या बिष्णुपुराजवळ त्यांच्या ताफ्याला अडवण्यात आले होते. त्यामुळे ते पुढे जाऊ शकले नव्हते. पण आता ते हेलिकॉप्टरने चुरंचदपूर येथे पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे. (Rahul Gandhi Visit to Manipur)

राहुल गांधी आज आणि उद्या (29-30 जून) मणिपूरमध्ये दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते मदत छावण्यांना भेट देणार आहेत. ते इम्फाळ येथून रस्त्याने चुरचंदपूरला जाण्यासाठी निघाले होते. मात्र बिष्णुपूरमध्ये पोलिसांनी राहुलच्या ताफ्याला रोखले. यावेळी पोलिसांनी राहूल यांना पुढे जाण्यासाठी हेलिकॉप्टरने जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्यांनी यासाठी नकार दिला होता.

 पोलिसांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल यांना रस्त्याच्या पुढे जाऊ दिले जाऊ शकत नाही. पोलिसांनी केलेल्या या कृत्याला पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांनी विरोध केला होता. मात्र आता त्यांना बिष्णूपूरमधून पुढे जाण्यावर आणलेली बंदी उठवली आहे. राहूल हे आता चुरंदपूर मध्ये पोहोचले आहेत.

'मणिपूरला शांतता हवी आहे, संघर्षाची नाही'

मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मणिपूरमध्ये राहुल गांधींच्या ताफ्याला पोलिसांनी बिष्णुपूरजवळ रोखले. संघर्षग्रस्त राज्यातील पीडितांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ते मणिपूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी मणिपूरबाबत मौन सोडण्याची तसदी घेतली नाही. आता त्यांचे दुहेरी इंजिन विध्वंसक सरकार सहानुभूती असलेल्या राहुल गांधींना रोखण्यासाठी निरंकुश पद्धती वापरत आहेत. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि सर्व घटनात्मक आणि लोकशाही मानदंडांचे उल्लंघन आहे. मणिपूरला संघर्षाची नाही तर शांतता हवी आहे.

राहूल यांच्या भेटीला विरोध

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, राहुल गांधींच्या दौऱ्याला मणिपूरमधील अनेक नागरी संस्था आणि विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने राहुल यांना रस्त्याने न जाता हेलिकॉप्टरने चुरचंदपूरला जाण्याची विनंती केली असल्याने त्यांच्या भेटीला विविध गटांकडून विरोध होत आहे. राहुल रस्त्याने जाण्यावर ठाम आहे. राजकीय फायद्यासाठी 'हट्टी' राहण्यापेक्षा संवेदनशील परिस्थिती 'समजून घेणे' महत्त्वाचे आहे अशी प्रतिक्रिया राहूल गांधी यांनी दिली होती.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news