पिंपरी : वल्लभनगर बसस्थानकात अस्वच्छतेचे साम्राज्य  | पुढारी

पिंपरी : वल्लभनगर बसस्थानकात अस्वच्छतेचे साम्राज्य 

पिंपरी : वल्लभनगर बस स्थानकात अस्वच्छता असल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्थानकात अनेक ठिकाणी कचरा पडलेला असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.  स्थानकातील पिण्याचे पाणी तीन ठिकाणी उपलब्ध आहे. त्यातील दोन ठिकाणच्या पिण्याचे पाणी बंद आहे. त्याचप्रमाणे स्थानकामध्ये एका ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध असून, त्या नळाभोवती शेवाळे जमा झाले असल्यामुळे ते अस्वच्छ दिसत आहे. त्यामुळे प्रवासी येथील अस्वच्छ पाणी पिऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
स्थानकामधील महिला व पुरुषांसाठी शौचालय उपलब्ध असून शौचालयामध्ये पाणी जमा होत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.  तसेच, परिसराची साफसफाई करण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांना घ्यावे लागते  विकतचे पाणी

या ठिकाणी असलेल्या नळाला अस्वच्छ पाणी येत असल्यामुळे प्रवाशांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे.  त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटक बसत आहे.
हिरकणी कक्ष बंद 
स्थानकातील हिरकणी कक्ष बंद असल्यामुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा
लागत आहे.
काम सुरू असल्यामुळे  बसला जागा मिळत नाही 
वल्लभनगर आगार मोठे असल्यामुळे मुक्कामासाठी आलेल्या बस येथे थांबलेल्या असतात. त्याप्रमाणे वल्लभनगर आगारातील काम संथगतीने सुरू असून तेथे मातीचे ढिगारे, पाईप पडलेले दिसून येत आहेत. त्याच ठिकाणी बस  थांबलेल्या असतात. स्थानकात वेड्यावाकड्या बस उभ्या असल्यामुळे रोजच वाहतूककोंडी होत आहे.
बसस्थानकाचा परिसर खूप मोठा आहे. महिलांना तिकिटामध्ये 50 टक्के सवलत दिल्याने अधिक गर्दी होत आहे. मात्र, अस्वच्छता व नियोजनाचा अभाव असल्याने बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे.
– पल्लवी वाघमारे, 
प्रवासी 
हेही वाचा

Back to top button