

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र' योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. जाणून घ्या 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र' योजनेअंतर्गत कोणत्या सुविधा मिळणार. (Ashadhi Wari 2023)
आषाढी एकादशी २९ जून रोजी आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जात आहेत. लाखो भाविक मजल-दरमजल करत विठ्ठ्लाच्या भेटीसाठी जात असतात. या प्रवासादरम्यान वारकरी आजारी किंवा अपघात यामुळे जखमी, मृत्यू होत असतात. हे टाळण्यासाठी राज्य सरकारने वारकऱ्यांना विमा संरक्षण दिलं आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र' योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.
या योजनेमुळे हजारो वारकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की," पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र' योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे." या योजनाचे संरक्षण वारीच्या ३० दिवसांसाठी असणार आहे. मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.
ट्विटमध्ये पुढे असे म्हंटले आहे की, वारकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा