आरोग्य विभागात बदल्यांसाठी प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर | पुढारी

आरोग्य विभागात बदल्यांसाठी प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आरोग्य विभागातील 2471 कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा प्रथमच ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या. बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असावी, या उद्देशाने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला.

शासनाने पहिल्यांदाच डॉक्टरांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतल्याने मानवी हस्तक्षेप बंद झाला आहे. ज्यांना एका संस्थेत ३ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशांना ऑनलाइन ट्रान्स्फर ॲपवर अर्ज करून पोस्टिंग निवडण्यास सांगण्यात आले होते. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक साॅफ्टवेअर तयार करण्यात आले. कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम भरण्यास सांगण्यात आले होते. अनुभव, सेवाज्येष्ठता असे विविध निकष यासाठी विचारात घेण्यात आले.

गट ”अ”, गट ”ब” आणि गट ”क”च्या बदल्या ऑनलाईन करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना मोबाईलवर सहजपणे बदली आदेश उपलब्ध झालेले आहेत. यापैकी २ हजार २८१ (९२ टक्के) बदल्या कर्मचाऱ्यांना पसंतीक्रमांकानुसार पदस्थापना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती सहसंचालक डाॅ. बबिता कमलापुरकर यांनी दिली.

तक्रारींसाठी सात दिवसांचा वेळ

बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या अवघड क्षेत्र, बिगर अवघड क्षेत्र, प्राधान्यक्रम १ ते ७ मधील कागदपत्रांची पडताळणी करणे, कार्यरत पदावर या पूर्वीच्या कामावरील ठिकाण याचा विचार करून कर्मचाऱ्यांने मागणी केलेले पसंतीक्रम, विकल्प, संभाव्य रिक्त पदांबाबत शिफारस करण्याची सोय ॲपमध्ये उपलब्ध केली आहे. तसेच या ॲपमध्ये बदलीबाबत काही तक्रारी असल्यास त्यासाठी ७ दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे.

हेही वाचा:

मोठी दुर्घटना : तामिळनाडूमध्‍ये दोन बसची समोरासमोर धडक; ४ ठार, ७० जखमी

आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची RAW प्रमुख म्हणून नियुक्ती

Mobile Addiction | धक्कादायक! मोबाईल हिसकावून घेतल्याने मुलीने रचला आईच्‍या हत्‍येचा कट

 

Back to top button