पाच वर्षांत 59 हजार बळी ; महामार्गावर 1 लाख 35 हजार अपघात

पाच वर्षांत 59 हजार बळी ; महामार्गावर 1 लाख 35 हजार अपघात
Published on
Updated on

प्रसाद जगताप : 

पुणे : राज्यातील विविध महामार्गांवर गेल्या पाच वर्षांमध्ये 1 लाख 35 हजार 103 अपघातांच्या घटना घडल्या असून, त्या अपघातांमध्ये 59 हजार 546 जणांचा मृत्यू झाला, तर 77 हजार 393 वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षित रस्ते प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात एकूण 18 राष्ट्रीय महामार्ग आणि बरेच राज्य महामार्ग आहेत. या सर्व महामार्गांची एकूण लांबी 33,705 किलोमीटर आहे.

यावरून दररोज लाखो-करोडो वाहनांची वाहतूक असते. महामार्गावर असणार्‍या विविध समस्या आणि वाहनचालकांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे गंभीरपणे लक्ष देत ठोस उपाययोजना करणे आता गरजेचे बनले आहे.

यंदा अपघाती मृत्यूंमध्ये घट
जानेवारी ते मे 2022 या गेल्या वर्षीच्या पाच महिन्यांमध्ये 6 हजार 915 वाहनचालकांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला. तर जानेवारी ते मे 2023 या चालू वर्षाच्या कालावधीत त्यामध्ये काही प्रमाणात घट झाली असून, 6 हजार 437 वाहनचालकांना जीव गमवावा लागला.

महामार्गावर होणारे अपघात कमी करण्यासाठी आम्ही राज्यातील सर्व पोलिस अधीक्षकांना कडक सूचना केल्या आहेत. तसेच, शालेय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाऊन रस्ते अपघातांबाबत सूचना करण्यात येत आहे. पोलिसांना रस्ते अपघाताबाबत जनजागृती कशी करावी, याकरिता प्रशिक्षण दिले आहे. त्यासोबतच महामार्गावरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यात येत आहेत. तसेच, दुचाकीस्वारांची हेल्मेटवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे.
        – डॉ. रविंदर सिंगल, अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य.

या उपाययोजना आवश्यक
वाहनांची वेगमर्यादा कमी करावी
वाहन चालविण्याचे व्यवस्थित प्रशिक्षण
ब्लॅक स्पॉट हटविणे
परवाना देताना कडक चाचणी घ्यावी
विनापरवाना वाहनचालकांना मोठा दंड करावा.
वाहनांची फिटनेस तपासणी वेळोवेळी व्हावी.
आयुर्मान संपलेली जुनी अवजड वाहने तत्काळ स्क्रॅप करावीत.

एकूण अपघात – 1 लाख 35 हजार 103
एकूण मृत्यू – 59 हजार 546
एकूण गंभीर जखमी – 77 हजार 393

एकूण किरकोळ जखमी – 33 हजार 531

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news